22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home लातूर दुधाच्या दरवाढीकरिता मनसेचे अनोखे आंदोलन

दुधाच्या दरवाढीकरिता मनसेचे अनोखे आंदोलन

एकमत ऑनलाईन

पानगाव : कमी झालेल्या दूध दराच्या संकटातून दूध उत्पादकांना वाचविण्यासाठी दुधाला प्रति लीटर १० रुपये अनुदान देवून मला व माझ्या मालकासह माझ्या अंसख्य भागिनींना वाचवावे, अशा आशयाचे खुले पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना गाईच्या माध्यमातून देवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी (दि. १) गाईसह किनगाव ते पानगाव रस्त्यावर दिवेगाव पाटी येथे आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

किनगाव ते पानगाव रस्त्यावर दिवेगाव पाटी येथे मनसेच्या वतीने शनिवारी दूध दराच्या प्रश्नासाठी दूध उत्पादक शेतक-यांसह गायींना घेऊन सरकारचा निषेध करत निदर्शने करून आंदोलन करण्यात  आले. दुधाला प्रति लीटर १० रुपये अनुदान
देण्याबाबत सरकारकडे अनेकवेळा निवेदनाद्वारे मागणी करुनही याची दखल घेतली जात नसल्याने चक्क गायीचे मनोगत पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

यावेळी गायीच्या शिंगांना निषेधाच्या काळ्या पट्ट्या बांधून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे, लातूर जिल्हाध्यक्ष भागवत शिंदे, रवी सूर्यवंशी, किरण चव्हाण, बाळासाहेब मुंडे, भागवत कांदे, चेतन चौहान, सूर्यकांत गालफाडे, दौलत मुंडे, प्रमोद कांदे, शिवराज सिरसाट, शहाजी केंद्रे, आबाजी डाके, दीपक कांदे, नाथराव आंबेकर, एकनाथ कांदे, मनोहर लटपटे, बालाजी कांदे, सदाशिव आंबेकर, शहेनशहा सय्यद, बालाजी हानवते, चंदू केंद्रे, राजू गोरे, अविनाश वाघमारे, असद शेख, असिफ शेख, बिभीषण जाधव, दीपक कांबळे, माधव घुले, सुलतान शेख, संजीव कांदे, भास्कर घुले, संभाजी भताने, दत्ता थोरमोटे, भरत संपते, विश्वास शिंदे, बळी सिरसाट, विश्वजीत राणा, कस्पटे, विशाल भिसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More  घरफोडीत साडेदहा लाखांचा माल चोरीला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,143FansLike
101FollowersFollow