34.7 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home लातूर लातूर ग्रामीण, औसा व देवणी तालुक्यांसाठी फिरते दवाखाने उपलब्ध

लातूर ग्रामीण, औसा व देवणी तालुक्यांसाठी फिरते दवाखाने उपलब्ध

एकमत ऑनलाईन

लातूर : पशुसंवर्धन विभागा अंतर्गत मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला एक फिरता पशुवैद्यकिय दवाखाना देण्याचे नियोजन असून त्या अंतर्गत लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण, देवणी व औसा तालुक्यासाठी तीन फिरते पशुवैद्यकीय दवाखाने मंजूर झालेले असून त्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते फीत कापून व हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी उप जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. कदम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर. डी. पडिले, समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्यासह पशु संवर्धन विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी लातूर जिल्ह्यासाठी तीन फिरते पशुवैद्यकीय दवाखाने मंजूर होऊन ते प्राप्त झाल्याची माहिती दिली.

औसा, लातूर ग्रामीण व देवणी तालुक्यातील पशुपालक शेतक-यांना याचा लाभ होणार असल्याची माहिती त्यांनी देऊन पुढील काळात प्रत्येक तालुक्यासाठी एक फिरते पशुवैद्यकीय दवाखाने मिळणार असल्याचं ही त्यांनी सांगितले. प्रारंभी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते फीत कापून व हिरवी झेंडी दाखवून या तिन्ही फिरतीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशु सेवेसाठी लोकार्पण करण्यात आले.

तत्पूर्वी आमदार धिरज देशमुख यांनी या फिरत्या दवाखान्यात उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली व संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून हे दवाखाने कशा पद्धतीने ग्रामीण भागात काम करणार आहेत याची माहिती जाणून घेतली.

पशुंना जागेवरच चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात
जिल्ह्यासाठीच्या तीन फिरते पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतक-यांच्या पशूंना चांगल्या आरोग्य सुविधा जागेवरच अत्यंत तत्परतेने उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश यावेळी आमदार धिरज देशमुख यांनी दिले.

पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,446FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या