27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरचापोली खून प्रकरणातील १२ पैकी ११ जणांना मोक्का

चापोली खून प्रकरणातील १२ पैकी ११ जणांना मोक्का

एकमत ऑनलाईन

चाकुर : जागेच्या वादातून १९ मार्च २०२२ रोजी शिरुर ताजबंद येथील सचिन शिवसांब दवणगावे (वय २६ वर्षे) यास चापोली-अजनसोंडा रस्त्यावरील एका खदाणीत नेऊन त्यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन खून केल्या प्रकरणी एकुण १२ संशयीत आरोपींपैकी ११ जणांवर मोक्का न्यायालयाने व नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक यांनी परवानगी दिली़ या प्रकरणाचा तपास चाकुर येथील सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम हे करीत आहेत.

शिरुर ताजबंद येथील सचिन दवणगावे यास दि. १९ मार्च रोजी जागेच्या वादातून या गावात राहणारा व सर्व प्रकरणाचा मुख्य सुत्रधार नारायण तुकाराम इरबतवाड व त्याच्या इतर सहका-यांनी चापोली शिवारातील खदाणीत नेऊन खून केला होता. याबाबत पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान मुख्य संशयीत आरोपी नारायण इरबतवाड हा पोलीस कोठडीतून पळून गेला़ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते व त्यांच्या पथकाने महाराष्ट्रासह १२-१३ राज्यांत काही दिवस आरोपीचा शोध घेतला़ तो १ जून रोजी रात्री लातूर येथील श्रीनगर येथील घरी आल्याची माहिती मिळताच मोहिते यांनी थेट त्याचे दार ठोठावले पोलिस आल्याचे लक्षात येताच इरबतवाड याने पोलीस निरीक्षक मोहिते यांच्यावर हल्ला केला होता.

तेव्हा पोलीस निरीक्षक मोहिते यांनी स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली होती़ त्यात इरबतवाड जखमी झाला होता. या प्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली. या १२ पैकी ११ जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या