27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरकबाल्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

कबाल्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : येथील स.नं.४ या शासकीय गायरानावरील अतिक्रमण कायम करून कबालनामे देण्याच्या संबंधाने नोटीसा देण्याचे जाणीवपूर्वक प्रलंबीत ठेवण्याच्या घटनेचा जाहीर निषेध करीत तहसिल कार्यालयावर मोर्चा काढताच खडबडून जागी झालेल्या तहसिल प्रशासनाने तातडीने लाभार्थ्यांना नोटीसा वाटपास सूरूवात केली.

आज प्रभागातील अतिक्रमण धारकाच्या वतीने कबालनाम्यासाठी पैसे भरण्याची नोटीस देऊन तातडीने कबलनामे वाटप करण्याची मागणी घेऊन युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसिलकार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता.उपविभागीय अधिकारी यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी तहसिलदार यांना आदेश देऊनसूध्दा राजकीय दबावापोटी येथील नागरिकांना पैसे भरण्याच्या नोटीसा दिल्या नाहीत. ही बाब लक्षात घेऊन या प्रकरणाचा पाठपूरवा प्रभागातील नागरीकांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून एक महिण्याच्या आत नोटीसा द्याव्यात अन्यथा तीव्र अंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता. मात्र तब्बल महीना उलटून सूध्दा प्रशासनाने कूठलीच कारवाई केली नाही.

शेवटी आज येथील प्रभागातील अतिक्रमण धारकांना घेऊन मोर्चा काढण्यात आला. तसेच धरणे व निदर्शने अंदोलन करण्यात आले. प्रसंगी कठोर भूमीका घेण्याची जनतेची मानसिकता पाहून प्रशासनाने लागलीच अतिक्रमण धारकांना नोटीसा वाटप करण्यास सूरूवात झाली. गेल्या कित्येक वर्षापासूनचा अतिक्रमण कायम करण्याबाबतचा लढा आज यशस्वी झाला असून अंदोलनाचा दणका बसताच प्रशासनाने अखेर अतिक्रमण धारकांना पैसे भरण्याच्या नोटीसा जारी केल्या आहेत. पूढील महिना भरायच्या आत पैसे भरून घेऊन कबालनामा वितरीत करावा तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचे फार्म भरून घेऊन घरकूल मंजूर करून द्यावे अशी आग्रही मागणी या वेळी डॉ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गिरीष गोंन्टे यांनी केले. तर या प्रसंगी शेख शेकूभाई, हाजी शेख, जाबेरखान पठाण, अण्णाराव सूर्यवंशी, मनोज मून्ना कांबळे, फरदीनभाई, प्रशांत जाभाडे आदींची भाषणे यावेळी झाली. शेवटी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.आभार प्रदर्शन आकाश सांगवीकर यांनी मानले. या मोर्चाला सय्यद याखूबभाई, प्रफुल्ल ढवळे, मोहम्मद पठाण, शेख नूरभाई, मनोज मून्ना कांबळे, शरद बनसोडे, आसेफखान पठाण, सतिश कदम, सिध्दार्थ वाघमारे, राहूल गायकवाड, संगमेश्वर बनसोडे,दिलीप भालेराव, आकाश सांगविकर, मोहसीन सय्यद, अजय भालेराव, मूकूंद बाळासाहेब वाघमारे, शेख ईमरान, शरद सोनकांबळे, प्रदीप सांगवीकर, रवी बनसोडे, शेख फरीद अहमद, शेख अस्लम, सय्यद नौशाद, प्रकाश लांडगे, राम कांबळे, पीटी कांबळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या