27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरअडीच वर्षांत जिल्ह्यात १० लाखांपेक्षा अधिक कोरोना टेस्ट

अडीच वर्षांत जिल्ह्यात १० लाखांपेक्षा अधिक कोरोना टेस्ट

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
कोरोना महामारीस प्रतिबंध घालण्यात लातूर जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य यंत्रणेने मोठ्या प्रमाणात कार्यरत होऊन शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत गेल्या अडीच वर्षांत जिल्ह्यातील १० लाख ६ हजार १९१ लोकांची कोरोना टेस्ट केली. त्यात ३ लाख ८१ हजार २५ आरटीपीसीआर टेस्टचा तर ६ लाख २५ हजार १६६ रॅपिड अ‍ॅटीजेन टेस्टचा समावेश आहे. ३ लाख ८१ हजार २५ आरटीपीसीआर चाचणीत ४४ हजार ४५५ तर ६ लाख २५ हजार १६६ रॅपिड अ‍ॅटीजेन चाचणीत ६० हजार ९८४ असे एकुण १ लाख ५ हजार ४३९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

संपूर्ण देशभरात कोरोना महामारीचा कहर सुरु होता. लातूर जिल्हा मात्र कोरोनापासून मुक्त होता. मात्र जिल्ह्यात एप्रिलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर ही संख्या सातत्याने वाढत गेली. प्रारंभीच्या पाच महिन्यांत म्हणजेच जुलैपर्यंत कोरोना बाधितांची संख्या जेमतेम होती. परंतु, जुनमध्ये लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता मिळाली. परिणामी मुंबई, पुणे, हैदराबाद आदी शहरांतील नागरिकांनी आपले गाव गाठले आणि कोरोना रुग्ण संख्येत पाहता पाहता वाढ झाली. आगस्ट महिन्यांत रुग्णसंख्या सहा हजाराच्या घरात गेली. त्यानंतर सप्टेंंबर महिन्यांत कहरच झाला. या एका महिन्यात १ हजार १८८ इतकी रुग्णसंख्या झाली. ऑक्टोबर महिना जिल्ह्यासाठी दिलासा देणार ठरला. या महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या कमी होत गेली. डिसेंबर महिन्यांत १ हजार १५० करोना रुग्णांची भर पडली तर नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात आतापर्यंत ८२३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. इतर रुग्णांनी मात्र कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

कोरोना महामारीने गेल्या काही दिवसांत काहींचा पिच्छा सोडल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांत रोज ३० ते ४० रुग्ण संख्या समोर येत आहे.. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली गेली. यादरम्यान लसीकरणाची गती ब-यापैकी वाढली. प्रारंभीच्या काळात नागरिकांनी स्वत:हून लसीकरण केंद्रांवर रांगा लावून लस घेतली. पहिला डोस मोठ्या प्रमाणात घेण्यात आला. दुसरा डोसही ५० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी घेतला आहे. प्रिकॉशन डोस, विद्यार्थ्यांचे लसीकरणही होत असल्यामुळे सध्याच्या चाचण्यांमधून कोरोनाबाधिकांची संख्या दिसत असली तरी कोरोनाची लक्षणे सौम्य असल्यामुळे एकही रुग्ण आजघडीला तरी उपचारार्थ दाखल नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या