औसा (संजय सगरे) : औसा तालुक्यात करोनाचा कहर वाढला असून प्रशासनांने दिलेल्या सूचनाना बगल देत गर्दी वाढत असल्याने कोरोना रुग्णसंख्या शहराबरोबरच ग्रामीण भागातही वाढली आहे . मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण औसा तालुक्यातील ७६ टक्के इतके असल्याने तालुक्यात स्थिती चांगले दिसून येत आहे. औसा तालुक्यात कोरोनाने १९ जणांचा बळी घेतला आहे. दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे .
आता औसा तालुक्यातील आरोग्य सेवेतील अधिकारी, कर्मचारी पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण वाढले आहे. औसा शहरासह उजनी, आलमला, रामेगाव, खरोसा या ठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहे. उजनी, औसा येथे बाजारपेठा आहेत येथील नागरिकांचा लातूर व अन्य शहरांतही दररोजचा संबंध असल्याने या ठिकाणी कोरोना संक्रमणाचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. तालुक्यातील कोरोना संक्रमित रुग्णसंख्या ११ सप्टेंबर रोजी १००२ एवढी झाली आहे. यात शहरातील यातील ३४२ व ग्रामीण भागात ६६० रुग्ण आहे. औसा तालुक्यात ४ जून रोजी फक्त दोन रुग्ण होते. केवळ तीन महिन्यांमध्ये एक हजार रुग्ण संख्या वाढली आहे. तालुक्यातील १००२ रुग्णांपैकी ७५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे दुर्दैवाने तालुक्यातील १९ जणांचा बळी गेला असून त्यात औसा शहरातील दहा व ग्रामीण भागातील नऊजणांचा समावेश आहे.
औसा तालुक्यातील कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तालुक्यातील औसा व लामजना येथे प्रत्येकी एक कोव्हिड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी विलगीकरण व उपचार केंद्र सुरू करण्यात आलेल्या सद्यस्थितीत याठिकाणी ११३ रुग्णालयात उपचार सुरू असून औसा सेंटरमध्ये ७६ तर लामजना येथे ४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय ५६ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत तर ४६ रुग्ण लातूरला खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कोरोना रणांगणातील औशातील वीर
कोरोना विरुध्दच्या लढाईत येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंगद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अभिषेक सानप शहरात अतिशय चांगले काम करीत आहेत तर ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सात प्राथमिक आरोग्य केंद्र व ३० उपकेंद्रांतील डॉक्टर्स , आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अहोरात्र सेवेत आहेत. कोव्हिड केअर सेंटर व तत्सम व्यवस्थेसाठी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे , तहसीलदार डॉ. शोभा पुजारी, निवासी तहसीलदार वृषाली केसकर, गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ, ग्रामसेवक ,तलाठी व नगरपालिकेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण हे प्रयत्नशील आहेत.
नांदेड जिल्ह्यात ३५३ कोरोनाचे नवे रूग्ण : ७ जणांचा मृत्यू