25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूर१४ गावांतून प्रभात फेरी; २८ हजार वृक्षांची होणार लागवड

१४ गावांतून प्रभात फेरी; २८ हजार वृक्षांची होणार लागवड

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात अजूनही रेल्वेनी पाणी आणल्याचे विसरत नाही. तो भूतकाळ विसरुन लातूर जिल्हा पाणीदार करायचा आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात मातीची धूप थांबविणा-या, पाणी धरुन ठेवणा-या, पर्यावरण आणि जैवविविधता जोपासणा-या वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात करुन लातूरात हाही एक पॅटर्न तयार करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले. दि. २४ जुलै रोजी मांजरा नदीच्या दुतर्फा एकाच वेळी ११ वाजून ११ मिनिटांनी २८ हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्याअनुषंगाने दि. २१ जुलै रोजी जनजागृतीपर लातूर शहरासह १४ गावांतून प्रभात फेरी काढण्यात आली होती. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. या उक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला.

जिल्हा क्रीडा संकुलातून सकाळी ७.३० वाजता प्रभात फेरीत निघाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोकमान्य
टिळक चौक, महात्मा गांधी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर प्रभात फेरीचा समारोप झाला. या प्रभात फेरीत ग्रीन लातूर टीमने वृक्ष दिंडी काढली होती. त्या दिंडीतील तुळशीचे वृंदावन घेऊन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल वारकरी झाले होते. लातूर तालुक्यातील भातखेडा, सोनवती, धनेगाव, शिवणी खुर्द, भातांगळी, भाडगाव, रमजानपूर, उमरगा, बोकनगाव, सलगरा ( बु.), बिंदगीहाळ तर औसा तालुक्यातील शिवणी बु, तोंडवळी, होळी या चौदा गावात वृक्ष लागवड होणार आहे अशा चौदा गावातही सकाळी मोठ्या उत्साहात जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली.

या प्रभात फेरीत राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी महाविद्यालय, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, त्रिपुरा महाविद्यालय, श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय, चन्नाबसवेश्वर महाविद्यालय, कै. व्यंकराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव, जायक्रांती महाविद्यालय लातूर, केशवराज विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय, कमाला नेहरु विद्यालय, बोरी, शिवाजी महाविद्यालय, शिवणी बु., राजर्षी शाहू विद्यालय, बोरी, १४ ग्रामपंचायत आणि तेथील जिल्हा परिषद शाळा यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या प्रभात फेरीतमध्ये ग्रीन लातूर वृक्ष टीम, आर्ट ऑफ लिंिव्हग, आधार फाऊंडेशन, लातूर वृक्ष चळवळ, आम्ही मावळे शिवबाचे, रोटरी मिडटाऊन, लातूर सायकलिस्ट क्लब, वसुंधरा प्रतिष्ठान या विविध संस्थाही या प्रभात फेरीत सहभागी झाल्या होत्या.

प्रत्येक गावात किमान अडीच हेक्टर क्षेत्रात ऑक्सिजन पार्क
लातूर जिल्ह्यातील वन क्षेत्र केवळ ७,९०० हेक्टर आहे. जिल्ह्याच्या क्षेत्रफळाचा विचार करता वृक्षाच्छादीत क्षेत्र केवळ पॉईंट नऊ टक्के एवढे आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड करुन त्याची जोपासना करण्याची पर्यावरणीय गरज आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रत्येक गावात कमीत कमी अडीच हेक्टर क्षेत्र वृक्षाच्छादीत ( ऑक्सिजन पार्क) करण्याचा संकल्प केला असून त्याची सुरुवात रविवार दि. २४ जुलै रोजी मांजरा नदीच्या दुतर्फा २८ हजार वृक्ष लागवड करुन केली जाणार आहे. या मोहिमेत स्वखुशीने नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या