29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeलातूरमॉर्निंग वॉर्क्सची मनपा केली कोरोना चाचणी

मॉर्निंग वॉर्क्सची मनपा केली कोरोना चाचणी

एकमत ऑनलाईन

लातूर : लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणा-यांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे आयुक्त यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त वसुधा फड, क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी यांनी दि. १८ एप्रिल रोजी मॉर्निंग वॉक-यांवर दंडात्मक कार्यवाही करुन ३६ जणांची करोना चाचणी करण्यात आली. पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिलेल्या आदेशानूसार लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अमन मित्तल सहायक आयुक्त वसुधा फड यांच्या सूचनेनुसार कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर करून संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवांना संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक मोठ्या संख्येने शहरात फिरत आहेत. वारंवार समज देऊनही विनाकारण फिरणा-यांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही सोबतच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. रविवारी अशा काही व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. मुख्य रस्त्यावर फिरणा-या व्यक्तींना शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या सयुक्त विद्यमाने मॉर्निंग वॉक ला जाणा-या ३६ लोकांचा १८ हजारांचा दंड वसूल करुन त्याच्या अ‍ॅन्टिजन चाचण्या करण्यात आल्या.

यावेळी पोलीस निरीक्षक सुनील पुजारी, धनंजय जाधव, गोविंद चामे, काकासाहेब बोचरे, विश्वास जाधव अंगद क्षिरसाठ ,रमेश कांबळे, चालक बालाजी झोडपे, क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक रवि शेंडगे, विकी खंदारे, शेख वजाहत, प्रमोद काळे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते इतर
मुख्य चौक येथे ही अशा चाचण्या केल्या जाणार आहेत.

नांदेड जिल्ह्यात १ हजार २८७ नव्या कोराना रूग्णांची भर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या