27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeलातूरलातूर, हरंगुळ, चिंचोली महसूल मंडळात सर्वाधिक पाऊस

लातूर, हरंगुळ, चिंचोली महसूल मंडळात सर्वाधिक पाऊस

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत लातूर ८६.३ मिलिमीटर, हरंगुळ बु. ८६.३ मिलिमीटर तर चिंचोली महसूल मंडळात ८७.५ मिलिमीटर पावस पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून लातूर जिल्ह्यात सर्वदुर भीजपाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत कमी-अधिक प्रमाणात पाणी पातळी वाढली आहे तर शेत-शिवारांनी कोवळ्या पिकांत पाणी मोठ्या प्रमाणात थांबले आहे. त्यामुळे कोवळी पिके पिवळी पडत असून शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून संततधार भीजपाऊस पडत आहे. अधुन-मधुन पावसाची गती वाढते. पुन्हा संततधार सुरु होते. अखंडपणे पाऊस पडत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. बुधवारी सकाळी ७ वाजेपर्यंत लातूर जिल्ह्यातील १६ महसूली मंडळात ६० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यात लातूर ८६.३ मिलिमीटर, हरंगुळ बु. ८६.३ मिलिमीटर, चिंचोली ८७.५, गातेगाव ७७.८, तांदुळजा ६६.५, कन्हेरी ६०, औसा ६१, भादा ६१, खंडाळी ६९.३, शिरुर ताजबंद ६०.५, हाडोळती ७३.८, पळशी ६७.३, जळकोट ७७.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

यावर्षी मान्सूनचे वेळेच्या अधी आगमन होईल व गत वर्षीपेक्षा या वर्षी भरपूर पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यामुळे शेतक-यांनी एप्रिल, मेच्या उन्हाची तमा न बाळगता खरीपाच्या पेरण्यासाठी रान तयार करुन ठेवली मात्र यंदाच्या मृग नक्षत्राने निराशा केली. आर्द्रा नक्षत्रातही समाधानकारक पाऊस पडला नाही. पुनर्वसू नक्षत्राने मात्र जिल्ह्यात पाणीच पाणी करुन टाकले. गेल्या आठ दिवसांपासून संततधार भीजपाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओढे, नाले वाहते झाले आहेत. काही साठवण तलावांत पाण्याची पातळी ब-यापैक वाढली आहे. मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांत अद्याप नोंद घ्यावी, असे जलसंचय झालेले नाही. मांजरा नदीवरील काही बराज पुर्ण क्षमतेने भरण्याच्या अवस्थेत आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३०७.९ मि. मी. पावसाची नोंद
जिल्ह्यात दि. १३ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत ५६.५ मिलिमीटर मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३०७.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. पडलेल्या पावसची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत. लातूर -६८.४ (२८२.१) मि. मी., औसा- ५६.० (१९६.६) मि.मी., अहमदपूर- ६६.० (४२५.७) मि.मी., निलंगा – ४१.३ (२१०.६) मि.मी, उदगीर- ५२.१ (३९९.१) मि.मी, चाकूर-५२.६ (३७०.२), रेणापूर-५५.० (२९८.३), देवणी- ३७.३ (३०१.६), शिरुर अनंतपाळ -४१.८ (३५४.०), जळकोट-६६.८ (४१६.०), पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३०७.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या