25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home लातूर आमदार पवार यांच्या कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी आंदोलन

आमदार पवार यांच्या कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी आंदोलन

एकमत ऑनलाईन

औसा : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणामुळे शैक्षणिक आणि नोकरीच्या क्षेत्रात दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द ठरवल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी शुक्रवार दि १८ सप्टेंबर रोजी औसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्गातील आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करीत मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने विधानसभेत मराठा आरक्षणासाठी आवाज उठवावा या मागणीचे निवेदन सादर करून आरक्षणाकडे लक्ष वेधले.

औसा येथील आयोजित आंदोलनात कार्यकर्त्यांनी आरक्षण नाही दिल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. या आंदोलनात अखिल भारतीय छावा संघटनेचे भगवान माकणे, विजयकुमार घाडगे, नागेश मुळे, नगरसेवक भरत सूर्यवंशी, गोपाळ धानुरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आकाश पाटील श्रीमती सोनाली गुळभिले, संजय जगताप, नितीन शिंदे, प्रदीप मोरे, पुरुषोत्तम नलगे, प्रवीण कोव्हाळे, वैभव मोरे, दिनेश जावळे यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या