19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeलातूरमतदारसंघातील रेल्वे प्रश्नी खासदार शृंगारे प्रयत्नशील

मतदारसंघातील रेल्वे प्रश्नी खासदार शृंगारे प्रयत्नशील

एकमत ऑनलाईन

चाकूर : लातूर लोकसभा मतदारसंघात रेल्वेसेवा अधिक विस्तारावी, रखडलेले प्रकल्प व कामे मार्गी लागावेत व विविध सुविधांद्वारे ही सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांनी पुढाकार घेतला असून रेल्वेमंञी पियूष गोयल यांनी घेतलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून संवाद साधला आहे.त्यास रेल्वेमंर्त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लातूर रेल्वेचे सर्व प्रश्न मार्गी लागतील असा विश्विास खासदार शृंगारे यांनी व्यक्तकेला आहे.  खासदार श्रृंगारे यांनी लातूर लोकसभा क्षेत्रात नवीन रेल्वे व रेल्वेविषयक कामे व प्रलंबित कामे यांची विस्ताराने माहिती दिली. लातूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न मांडले. त्यात पिटलाईनसाठी मंजूर झालेले १४ कोटी लवकर मिळावेत.लातूरच्या पिटलाईन कामास लक्ष घालून तो वितरीत करावे.

लातूरहून नवीन रेल्वे गाड्या सुरुकरता येईल. तिरुपती- लातूर- तिरुपती मार्ग नवीन रेल्वे गुंतकल, वाडी, मंञालय रोड, गाणगापूर, गुलबर्गा, हुमनाबाद, बीदर उदगीर मार्गे सुरु करण्यात यावा यामुळे लातूरकरांची अनेक वर्षापासूनची मागणी मार्गी लागेल.     मुंबईला जाण्या-या लातूरकर व्यापारी,प्रवाशांची गैरसोय थांबविण्यासाठी  लातूर ते मुंबई नवीन एक रेल्वे सुरुकरण्यात यावी व रोज सुरु असलेल्या रेल्वेला साधारण डब्यांची संख्या वाढवावी, नवीन हैदराबाद-मुंबई ,बिदर-मुंबई व परळी-तिरुपती या नवीन रेल्वेची मागणी लातूरच्या जनतेतून होत आहे. लातूररोड-जळकोट-बोधन रेल्वेमार्गाचे सर्व्हेक्षण  दक्षिण मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. १३५ कि मी साठी २४०९ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. हे काम लवकर सुरु करावे.

दोन वर्षापासून प्रलंबित असेलेल्या लातूर रोड-अहमदपूर-लोहा-नांदेड रेल्वे मार्गास लवकर मंजूरी देऊन कामास सुरुवात करावी. वडवळ ना.येथील रेल्वे स्थानकावर एटीव्हीएम व्दारा तिकीटांची सुविधा उपलब्ध करुन द्यावी व प्लाटफॉर्मची उंची वाढवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. रेल्वे क्राँसींग व लूपलाईनसाठी ५ कोटी रुपये मंजूर असून काम अद्याप सुरुनाही ते लवकर सुरु करावे.जानवळ येथील रेल्वेगेट २०१० पासून बंद असून तेथे आरयुबी (अंडरग्राऊंड ब्रीज) करणे आवश्यक आहे असल्याचे खासदार शृंगारे यांनी सांगितले.

तिरुपतीसाठी रेल्वेचा आग्रह
लातूरहून मोठ्या संख्येत तिरुपतीला नागरिक जातात. तथापी या शहरातून थेट तिरुपतीस जाण्यासाठी रेल्वेचे सुविधा नाही. ही रेल्वे सुरूव्हावी अशी लातुरकरांची जुनी मागणी आहे. ती सुरूझाल्यास लातूरकरांची सोय तर रेल्वेला चांगला महसूलही मिळणार आहे. त्यामुळे लातूरसाठी विशेष बाब म्हणून ही रेल्वे सुरू करावी अशी आगृही मागणी यावेळी खा. शृंगारे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली.

खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेलं वक्तव्य हे लोकशाहीची थट्टा करणारे -माजी आमदार हरिभाऊ राठोड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या