अंधोरी : वार्ताहर
शिव जन्मोत्सव सोहळ्या-निमित्ताने धानोरा (बु) येथे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात वसंत विद्यालय धानोरा बु येथे इयत्ता ९ वी मध्ये शिकणारी कु. तनाज नय्युम शेख हिने प्रथम पारितोषिक पटकावले. रोख रक्कम ७०० रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मानखेड ता.अहमदपूर येथील आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय पारितोषिक मिळविले. यात रुपये ५००० रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आल. या यशाबद्दल कु. तनाजचे पालक, शिक्षक, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
कु..तनाज शेख हीस जिल्हास्तरीय पारितोषिक
एकमत ऑनलाईन