25 C
Latur
Friday, January 22, 2021
Home लातूर महावितरणच्या अभियंत्यास मनसेने घातला घेराव

महावितरणच्या अभियंत्यास मनसेने घातला घेराव

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : गेली चार महिन्यांपासून जनता लॉकडाऊनमध्ये बेरोजगार असताना कुठलीही कल्पना न देता महावितरणने केलेल्या वीजदर वाढीचा निषेध व्यक्त करीत मनसेने अहमदपूर येथील महावितरण कार्यालयात जिल्हाध्यक्ष डॉ नरंिसह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली अभियंत्याला घेराव घालत ठिय्या मांडला व पीडित शेतक-यांचे वीज बिल कमी करण्यास भाग पाडले.

तालुक्यात अनेक गावातील शेतक-याना त्यांचे मीटर रिडींग न बघता वर्षानुवर्षे कार्यालयात बसूनच वीजबिल पाठवले जात आहेत. त्यातच आता वीज दर वाढवला आहे. या महामारीमध्ये लोकांच्या हाताला काम नसताना हजारो रुपयांचे वीजबिल कसे भरणार असा प्रश्न मनसेने उपस्थित करीत अगोदर चार लाख शेतक-यांचे २०१२ ते २०१९ पर्यंतचे तीस हजार कोटी जे कोर्टाने महावितरणला शेतक-यांंना वाढीव युनिट लावून लुटल्याबद्दल परत करा असा निर्णय दिला आहे ते परत करा असे डॉ भिकाणे यांनी सांगितले.

या ठिय्या आंदोलनानंतर अभियंत्यानी पीडित शेतक-यांचे वीज बिल कमी करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष डॉ मिंिलंद साबळे,भुजंग उगीले,माधव राठोड,कृष्णा जाधव,अतिष गायकवाड आदींसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

अन्यथा खळखट्याक आंदोलन
हे महावितरण कार्यालय नाही तर वर्षानुवर्षे तीन च्या विजपंपाला पाचच्या पंपाचे, पाचच्या पंपाला साडेसातचे,साडे सातच्याला दहाचे वाढीव बिल लावून शेतक-यांचे तीस हजार कोटी लाटले आहेत. एवढेच नाहीतर शेतक-यांच्या नावावर शासनाची ही फसवणूक करीत कोट्यवधी रुपयांचे अनुदान शेतक-यांच्या नावावर लाटले आहे. ही दुहेरी लूट बंद नाही केली तर मनसे खळखट्याक करणार अशी प्रतिक्रिया डॉ भिकाणे यांनी दिली.

कोवीड हॉस्पिटलचे आज उद्घाटन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,415FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या