27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरलातूर परिमंडलात चार मीटर एजन्सीला महावितरणचा शॉक

लातूर परिमंडलात चार मीटर एजन्सीला महावितरणचा शॉक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लघुदाब वर्गवारीतील सुमारे २ कोटी १५ लाख ग्राहकांना वीज वापराप्रमाणे अचूक मीटर रींिडगचे बिल देण्यासाठी महावितरणने गेल्या फेब्रुवारीपासून विविध उपाय योजनांना सुरवात केली आहे. यामध्ये हेतुपुरस्सर चुका व अचूक रींिडगमध्ये हयगय केल्याचे आढळून आल्याने राज्यातील तब्बल ४७ मीटर रींिडग एजन्सीजना बडतर्फ करण्यात आले आहे. यातील ८ एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. कारवाई करण्यात आलेल्या यादीत लातूर परिमंडलातील चार एजन्सीचा समावेश आहे. मेसर्स सहारा इंटरप्राईजेस-देवणी, मेसर्स स्वामी समर्थ स्वयंरोजगार एजन्सी- तेलगाव (ता. आंबाजोगाई), मेसर्स श्री. जय श्रीरामदाता- गेवराई व मेसर्स शीव मल्टी सर्व्हिसेस- बीड या चार एजन्सीवर कारवाई करण्यात आली आहे. या धडक उपाययोजनांमुळे मीटर रींिडगच्या बाबतीत ग्राहकांच्या तक्रारींमध्ये मोठी घट झाली असून महावितरणच्या महसूलात देखील वाढ झाली आहे.

वीजगळती कमी करण्यासोबतच ग्राहकहिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत महावितरणने ग्राहकाभिमुख सेवेच्या सुधारणांना मोठा वेग दिला आहे. यात महत्वाच्या बिंिलगसाठी वीजमीटरच्या अचूक रींिडगला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. याबाबतीत आढावा घेताना १०० टक्के अचूक मीटर रींिडग अपेक्षित असताना त्यात हयगय होत असल्याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांना आढळून आले. या प्रकाराची त्यांनी गंभीर दखल घेतली व महावितरणच्या इतिहासात प्रथमच राज्यातील थेट सर्व मीटर रींिडग एजन्सीजचे संचालक तसेच क्षेत्रीय उपविभाग कार्यालयांचे प्रमुख व लेखा अधिकारी यांची व्हीसीद्वारे ताबडतोब आढावा बैठक घेतली होती. ‘कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीजमीटरचे रींिडग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व बिल दुरुस्तीचा त्रास तसेच महावितरणच्या महसूलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रिडींग घेण्यात हयगय करणा-या एजन्सीजविरुद्ध कारवाई करावी’ असे निर्देश त्यांनी दिले होते.

त्याप्रमाणे गेल्या फेब्रुवारीपासून मुख्यालय व क्षेत्रीय कार्यालयांनी एकत्रितपणे पर्यवेक्षणातून मीटरच्या अचूक रींिडगसाठी धडक उपाययोजनांना सुरवात केली आहे. महावितरणच्या सुमारे २ कोटी १५ लाख लघुदाब ग्राहकांकडील मीटरचे रींिडग कंत्राट पद्धतीच्या एजन्सीजद्वारे करण्यात येते. या एजन्सीजने काढलेल्या मीटर रींिडगच्या फोटोची खातरजमा व पडताळणी करण्यासाठी मुख्यालयात यापूर्वीच स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाने केलेल्या पडताळणीमध्ये मीटर रींिडगचे फोटो अस्पष्ट असणे, फोटो व प्रत्यक्ष रींिडगमध्ये तफावत असणे तसेच रींिडग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे आदी प्रकार आढळून येत आहे. त्याप्रमाणे संबंधित रींिडग एजन्सीच्या कामामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु हयगय कायम राहिल्यास एजन्सीजविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या