21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरमहापालिकेने शहरातील अतिक्रमणे हटविली

महापालिकेने शहरातील अतिक्रमणे हटविली

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात अतिक्रमणे वाढत चालली आहेत. त्याविषयी जागरुक नागरिकांनी अनेकवेळा ही बाब लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या लक्षात आणुन दिली. मात्र अतिक्रमणविरोधात अ‍ॅक्शन होताना दिसत नव्हती. अखेर महानगरपालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून दि. ४ ऑगस्ट रोजी शहरातील मिनी मार्केटच्या कोप-यावरील ८ ठिकाणचे अतिक्रमणे काढण्यात आली.

शहरात काही ठिकाणी रात्रीतून अतिक्रमणे झालेली आहेत. हळूहळू अतिक्रमणाची संख्या वाढत गेल्याने शहराचे बकाळ स्वरुप झाले आहे. लातूर शहर महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर तर अतिक्रमणाची संख्या अधिकच वाढत गेली. वाढत्या अतिक्रमणाबाबत जागरुक नागरिकांकडून समाजमाध्यमावर सतत चर्चा होत राहिली. या विषयी संबंधीतांच्या लक्षात आणुनही दिले. तरीही अतिक्रमणाची संख्या वाढतच गेली. आजही शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत होत आहेत. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने याकडे अतिश्य जागरुकपणे पाहणे आवश्यक आहे, अशी जागरुक नागरिकांची अपेक्षा आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अमन मित्तल यांनी दिलेल्या आदेशावरुन शहरातील मिनी मार्केटच्या कोरप-यावरील विकासत्न विलासराव देशमुख मार्गाच्या कोप-यावरील आठ दुकाने महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने गुरुवारी काढली. सकाळी १० वाजता अतिक्रमण विरोधी विभाग प्रमुख रवि कांबळे, क्षेत्रीय अधिकारी किशोर पवार, स्वच्छता निरीक्षक मोरे, सुरेश कांबळे, अतिक्रमण विरोधी विभागातील कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांनी जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमीत आठ दुकाने हटवली. अनेक वर्षांपासूनचे हे अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सायंकाळपर्र्यत सुरुच होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या