22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूर२०० पेक्षा अधिक घरकुले रद्दचा मनपाचा प्रस्ताव!

२०० पेक्षा अधिक घरकुले रद्दचा मनपाचा प्रस्ताव!

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (शहरी) लातूर शहरात पहिल्या व दुस-या डीपीआरमध्ये ९१० घरकुलांचे बांधकाम मंजूर झाले होते. त्यापैकी २६१ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर ३२७ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. दोन वर्षांपुर्वी मंजूरी मिळूनही बांधकाम सुरु न झालेल्या २०० पेक्षाअधिक घरकुले रद्द करण्याचा प्रस्ताव म्हाडा विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तीन लाखांच्या आत उत्पन्न असणा-या लाभार्थ्यांकडून लातूर शहर महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (शहरी) टप्प्या-टप्प्याने ऑनलाईन अर्ज मागविले होते. एकंदर आकडेवारी पाहता आतापर्यंत पाठविलेल्या ८ डीपीआरमधील ६ हजार ४५६ घरकुलांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यातील २६३० घरकुलांच्या बांधकामाचे आदेश लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. १०६२ घरकुलांचे बांधकाम आतापर्यंत पूर्ण झाले आहेत, तर १९८३ बांधकामे प्रगतीपथावर आहेत. पहिल्या डीपीआरमध्ये ४२२ घरकुले मंजूर झाली. पैकी २७९ जणांना बांधकाम आदेश दिले. १२५ घरकुले पूर्ण, तर १५४ पूर्णत्वाकडे आहेत.

दुस-या डीपीआरमध्ये ४८८ घरकुले मंजूर झाली. पैकी ३०९ जणांना बांधकाम आदेश दिले. १३६ घरकुल पूर्ण, तर १७३ पूर्णत्वाकडे आहेत. तिस-या डीपीआरमध्ये १२३४ घरकुले मंजूर झाली. पैकी ७७१ बांधकामाचे आदेश दिले. ३५६ घरकुले पूर्ण, तर ४१५ घरकुले पुर्णत्वाकडे आहेत. चौथ्या डीपीआरमध्ये १५६७ घरकुले मंजूर झाली. पैकी ८३० बांधकामाचे आदेश दिले. ३१९ घरकुल पूर्ण, तर ५११ पुर्णत्वाकडे आहेत. पाचव्या डीपीआरमध्ये ३४५ घरकुले मंजूर झाली. पैकी २०४ बांधकामाचे आदेश दिले. पैकी ९ घरकुल पूर्ण तर १९५ घरकुल पूर्णत्वाकडे आहेत.

सहाव्या डीपीआरध्ये १२५० घरकुले मंजूर झाली. पैकी ५२८ बांधकाम आदेश दिले. २ घरकुल पुर्ण, तर ५२६ पूर्णत्वाकडे आहेत. सातव्या डीपीआरमध्ये १११० घरकुलांना दोन महिन्यांपूर्वी मेअखेर मंजूर झालेले आहेत. दरम्यान यातील पहिल्या व दुस-या डीपीआरमधील ९१० घरकुले दोन वर्षांपुर्वी मंजूर झालेले आहेत. त्यातील २६१ घरकुल पूर्ण झालेले आहेत आणि ३२७ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. म्हणाजे ३२२ लाभार्थ्यांनी घरकुल मंजूर होवूनही बांधकाम सुरु केलेले नाही.

शंभरावर लाभार्थ्यांनी बांधकाम सुरु करण्याची दाखवली तयारी
सन २०२० ते २०२१ या वर्षामध्ये कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे दोन लॉकडाऊनमध्ये सर्वकाही ठप्प होते. ही बाब समजून महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना विभागाने बांधकाम सुरु न केलेल्या संबंधित लाभार्थ्यांना बांधकाम सुरु करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यानूसार शंभरावर लाभार्थ्यांनी बांधकाम सुरु करण्यासाठी कागदपत्रे दाखल केली आहेत. आणखी दोनशेवर लाभार्थ्यांनी कसल्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे पहिल्या व दुस-या डीपीआरमध्ये मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम अद्याप सुरु केलेले नाही, अथवा महानगरपालिकेकडे विहीत कागदपत्रे सादर केलेली नाहीत, त्यांचे घरकुल रद्द करण्याची प्रक्रिया करुन तसे प्रस्ताव म्हाडा विभागाकडे पाठविले जाणार आहेत. ज्यांचे घरकुल मंजूर आहे, त्यांनी लवकर बांधकाम परवाना घ्यवा व बांधकाम सुरु करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या