22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरमोहनाळगाव शिवारात अनोळखी व्यक्तीचा खून

मोहनाळगाव शिवारात अनोळखी व्यक्तीचा खून

एकमत ऑनलाईन

चाकूर : तालुक्यातील मोहनाळ गाव शिवारामध्ये चाळीस वर्षीय एका व्यक्तीला विवस्त्र करून अमानुष खून करण्यात आल्याची घटना सोमवारी दि २५ रोजी सकाळी निदर्शनास आली असून याबाबत अज्ञात मारेक-याविरूध्द खूनाचा गुन्हा चाकूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील मोहनाळ गावा शिवारात एक अनोळखी मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली, पोलीसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर हा मृतदेह अहमदपूर येथील साठेनगर भागात राहणा-या अंकुश देवराव डावरे (वय ४०) या व्यक्तीचा असल्याची माहिती मिळाली. त्याच्या डोक्यात धारधार हत्याराने हल्ला केल्याचे , तसेच विवस्त्र करून शरीरावर विविध ठिकाणी मारहाण करण्यात आली असल्याचे आढळून आले. मयत अंकुश डावरे हे घरणी येथील जावाई असून रविवारी दि २४ रोजी विवाह समारंभासाठी ते आले होते.

विवाह समारंभ झाल्यांनतर अहमदपुरला जात असल्याचे सांगून ते सासरवाडीतून निघाले होते. सोमवारी सकाळी मोहनाळ शिवारात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयंिसह देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी बलराज लंजिले, पोलीस उपनिरीक्षक कपिल पाटील, तुकाराम फड, हणमंत आरदवाड, मारोती तूडमे, सुभाष हरणे, सुग्रीव मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरूवात केली आहे. याबाबत पोलीस हवालदार मारोती तुडमे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेक-यांविरूध्द चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या