29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home क्राइम भालकीत युवकाचा किरकोळ कारणावरून खून

भालकीत युवकाचा किरकोळ कारणावरून खून

एकमत ऑनलाईन

उदगीर : किरकोळ कारणावरून भालकी (जि.बिदर) येथील एका युवकाचा येथील बिदर रेल्वे उड्डाणपुलाखाली शनिवारी (ता. ३०) पहाटे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.पहाटेच्या सुमारास पायी फिरायला जाणा-या नागरिकांना एक युवक मृत अवस्थेत पुलाखाली पडला असल्याचे आढळून आले. त्यानंतर काही नागरिकांनी ग्रामीण पोलिसांना फोनवर या घटनेची माहिती दिली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक घारगे त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या मयताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला.

या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर उमेश मुरलीधर उखंडे (वय-४०) रा सोनार गल्ली, भालकी (कर्नाटक) या व्यक्तीचा खून झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज आधारे घटनास्थळाच्या शेजारील लॉजचा कर्मचारी युवराज पाटील यास ताब्यात घेतले आहे. कमरेच्या बेल्टने मारहाण झाल्याने या इसमाचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या मयताचे प्रेत येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी बीट अंमलदार रंगवाळ, डीबी पथकाचे नामदेव सारूळे, चंद्रकांत कलमे, तुळशीदास बरूरे, राहुल गायकवाड आदींनी पुढाकार घेतला आहे.

पुन्हा ग्रामीण हद्दीत खून…
सध्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे चांगलेच चर्चेत आले. आहे ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत खुणाच्या अनेक घटना घडत आहेत. हैबतपुर येथील एका खून प्रकरणामुळे उदगीर शहरात दगडफेक झाली. वातावरण तणावपूर्ण निर्माण झाले होते. अनेक अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातच शनिवारी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यामुळे पुन्हा ग्रामीण पोलीस ठाणे चर्चेत आले आहे.

आश्वासनपूर्ती न झाल्यास आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या