लातूर : सिध्देश्वर मंदिराच्या परिसरात २५ वर्षीय तरूणाच्या डोक्यात पाठीमागून मारून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली.
श्रीकांत ऊर्फ बबलू आत्मलिंग चिल्लरगे (वय २५, रा. तत्तापूर ता रेणापूर) हा ड्राव्हरचे काम करताना कांही दिवस पाणी पुरवठयाचे काम केले. त्यानंतर दररोज भाजीपाला मार्केटला नेण्याचे काम करत होता. काम झाल्यानंतर रात्री सिध्देश्वर मंदिराच्याच्या बाजूला वसंत बुरबुरे यांच्या शेतात आसलेल्या वॉटर प्लॅन्टच्या लगत असलेल्या रूमध्ये झोपण्यासाठी जात होता. मंगळवारी रात्री कांही मित्रांच्या सोबत पार्टी केली. पार्टीच्यानंतर रात्री श्रीकांत चिल्लरगे यांच्या डोक्यात पाठीमागून मारल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती बुधवारी सकाळी समजताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी गेले असता मृतदेह रक्ताच्या थारोळयात पडलेला दिसून आला. सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेहाची उत्तरणीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ओम चिल्लरगे यांच्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलिस ठाण्यात ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिघांना घेतले ताब्यात
श्रीकांत चिल्लरगे यांच्याकाडे मंगळवारी कोथींबीर विकलेले २ लाख ८० हजार रूपये होते. रात्री मित्रांच्या सोबत पार्टी झाल्यानंतर खूनाची घटना घडल्याने पोलिस आर्थिक दृष्टीकोणातूनही तपास करत आहेत. त्यासाठी पोलिसांनी तीघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपिंना लवकरच ताब्यात घेण्यासाठी पोलीसांची कारवाई सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शेख यांनी सांगीतले.
देशात १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल