29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home लातूर बामणी येथे मारहाणीत एकाचा खून

बामणी येथे मारहाणीत एकाचा खून

एकमत ऑनलाईन

निलंगा : निलंगा तालुक्यातील बामणी या गावात रात्री आठ वाजता मागील भांडणाची कुरापत काढून गैर कायद्याची मंडळी एकत्र जमून एका व्यक्तीचा निर्घुण खून केला असल्याची घटना घडली आहे. निलंगा पोलिसांनी तात्काळ आरोपींवर कारवाई करत दोन आरोपीला ताब्यात घेतले तर आठ आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. जोपर्यंत सर्वच आरोपी ताब्यात घेणार नाही तोपर्यंत आम्ही मयतावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेत मयताच्या नातेवाईकांनी निलंगा पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडला व त्यानंतर एक तास रास्ता रोको केले.

निलंगा तालुक्यातील बामणी या गावात रात्री आठ वाजता जगन्नाथ किसन शिंदे (वय ४१) याच्यावर काठीने हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली. यावेळी मयताची बहिण सुनीता अर्जुन रणदिवे यांच्या फिर्यादीवरून बाबू उर्फ विजय ढाले, हनुमंत माणिक गायकवाड, राम हनुमंत गायकवाड, गोरख हनुमंत गायकवाड, अरविंद नामदेव गायकवाड, शशिकांत उर्फ संदेश अरंिवद गायकवाड, मल्हारी रंगराव गायकवाड, दिगंबर परमेश्वर गायकवाड, शंभो मल्हारी गायकवाड रा. सर्व बामणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मयत जगन्नाथ किशन शिंदे यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे दाखल करण्यात आले. मात्र मयताच्या नातेवाईकांनी जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेत निलंगा पोलिस स्टेशनच्या समोर ठिय्या मांडला. तर आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी चक्क मुख्य रस्ता अडवून एक तास रास्ता रोको केला. यावेळी क्रांतिवीर लहुजी सेना जिल्हा प्रवर्तक सत्य शिंदे, जिल्हाध्यक्ष गोविंद सूर्यवंशी, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा गंगाबाई कांबळे, उस्मानाबादचे लहुजी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष दिलीप गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी वाघमारे यांनी यावेळी सर्व मारेक-यांना तात्काळ अटक करा अशी मागणी केली. या घटनेचे वृत्त कळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल चोरमले हे पुढील तपास करत आहेत.

कुख्यात गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळाला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या