22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरकिरकोळ भांडणावरून एकाचा डोक्यात काठी घालून खून

किरकोळ भांडणावरून एकाचा डोक्यात काठी घालून खून

एकमत ऑनलाईन

औसा : तालुक्यातील आलमला येथे दोघात किरकोळ बाचाबाची होऊन त्यातून कडाक्याच्या भांडणात झाले व यात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची माहिती अशी की आलमला येथील राजू राम सुरवसे वय 38 वर्ष आणि बाळू वाघमारे वय 42 वर्षे या दोघांमध्ये शनिवार दिनांक आठ मे रोजी सायंकाळी गावात जिल्हा परिषद शाळेसमोर किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या भांडणाचे पर्यवसान जबर मारहाणीत झाले.

बाळू वाघमारे यांने मयत राजू राम सुरवसे यांच्या डोक्यात काठीने जबर मारहाण केली या मारहाणीत राजू सुरवसे यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेचे वृत्त कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले औसा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.घटनास्थळी पंचनामा करून मयताचे प्रेत औसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले असून आरोपी बाळू वाघमारे अद्याप फरार आहे.
औसा पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

इंटर्न डॉक्टरांचे आंदोलन: कोविड वॉर्डात रुजू होणार नसल्याचा पवित्रा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या