शिरुर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या सर्व सतरा जागेचा निकाल लागला. भाजपाने नऊजागा ंिजकून सत्ता कायम ठेवली असून भाजपा शहराध्यक्षांना पराभवाचा धक्का बसल्याने भाजपाचा गड आला पण सिंंह गेला अशी परिस्थिती झाली आहे. पहिल्यांदाच एंट्री करीत राष्ट्रवादीने तीन जागा तर शिवसेना चार जागा ंिजकत मुसंडी मारली आहे. काँग्रेसने एक जागा ंिजकत खाते उघडले आहे.
या निवडणुकीत भाजपा शहराध्यक्ष अॅड.गणेश सलगरे,माजी नगरसेवक सुमतीनंदन दुरुगकर, विशाल गायकवाड यांना तर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अशोक कोरे,अविनाश अचवले,राष्ट्रवादीचे डॉ.उद्धव गायकवाड या दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला तर काँग्रेसचे सुधीर लखनगावे,राष्ट्रवादीचे तांदळे, संभाळे, बाळू शिवणे, शिवसेनेचे अनंत काळे, शिवणे, आवाळे, खरटमोल यांनी पदार्पणातच विजय मिळविला आहे.
दरम्यान माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रदेश सचिव अरंिवद पाटील निलंगेकर,अॅड संभाजीराव पाटील, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी गेल्या पाच वर्षात शहरात केलेल्या विकास कामाच्या मुद्यावर निवडणूक लढवली. भाजपा प्रदेश सचिव अरंिवंद पाटील निलंगेकर यांनी पूर्ण प्रचार यंत्रणा लावली होती. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे प्रदेश युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण व शिवसेना नेत्या डॉ. शोभाताई बेंजरगे यांनी सहका-यांच्या साथीने भाजपाला कडवी झुंज देत आठ जागा ंिजकून चांगले यश संपादन केले.
शिरूर अनंतपाळ नगरपंचायत निर्मितीनंतर झालेल्या दुस-या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी भाजपा व महाविकास आघाडीच्या घटक पक्षात अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. यात सतरापैकी नऊ जागा भाजपाला तर महाविकास आघाडीला आठ जागांवर विजय मिळाला.एकतर्फी वाटणा-या या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार टक्कर दल्यिाने एक हाती सत्ता असलेल्या भाजपाने बहुमत सत्ता राखली आहे