22.5 C
Latur
Thursday, October 1, 2020
Home लातूर माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे

माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे

एकमत ऑनलाईन

१५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर मोहीमेचा पहिला टप्पा. १४ ते २४ ऑक्टोबर दुसरा टप्पा . या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांची तपासणी होणार
लातूर : कोविड-१९ विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेचे दोन टप्पेअसून पहिला टप्पा हा दि. १५ सप्टेंबर ते दि. १० ऑक्टोबर तर दुसरा टप्पा हा दि. १४ ते २४ ऑक्­टोबर या कालावधीत होणार आहे. ही मोहीम जिल्ह्यातील नागरिकांसाठी असल्याने प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे व तपासणीसाठी येणा-या आरोग्य पथकाला योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल बोलत होते. यावेळी महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी निवडणूक संतोष राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हरदास आदी उपस्थित होते.

माझे कुटूंब, माझी जबाबदारी या मोहिमेचा पहिला टप्पा दि. १५ सप्टेंबर ते दि. १०ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा दि. १४ ते २४ ऑक्टोबर असा असणार आहे. जिल्ह्यात या मोहिमेचे काम दि. १५ सप्टेंबर पासून सुरू होईल. यामध्ये प्रथम जिल्हा, तालुका ग्रामस्तरावरील समितीची स्थापना तसेच महापालिका शहरी भाग व ग्रामीण भागातील आरोग्य पथके गठीत करून आदेश निर्गमित करावेत. तसेच दि. १६ व १७ सप्टेंबर रोजी आरोग्य पथकातील कर्मचारी व स्वयंसेवक यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे तर दि. १८ सप्टेंबर पासून या मोहिमेचा जिल्ह्यात शुभारंभ करण्याचे नियोजन करावे अशा सूचना देवून गोयल म्हणाले की, ग्रामीण भागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी महापालिकेसाठी मनपाआयुक्त व जिल्ह्याच्या इतर नागरी भागासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आरोग्य पथके तयार करून त्याबाबतचे आदेश दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळ पर्यंत निर्गमित करावेत.

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रसाठी संबंधित तहसीलदार यांनी एका वाहनांची उपलब्धता करावी. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांची या मोहीम काळात तपासणी घरोघरी जाऊन केली जाणार आहे. एक ही व्यक्ती आरोग्य तपासणी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित आरोग्य पथक व त्यावरील नियंत्रण अधिका-यांनी घ्यावी, असे निर्देश गोयल यांनी दिले. जिल्ह्यात माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा. व ही मोहीम नागरिकांसाठी असल्याने या मोहिमेत जिल्ह्यातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन गोयल यांनी केले.प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे यांनी माझे कुटुंबाची-माझी जबाबदारी या मोहिमे विषयी माहिती विषद केली व या मोहिमेचा उद्देश सांगितला.

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने मोहिम राबविण्यात येणार
या मोहीमेमध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जाणार आहे. यासाठी वॉर्ड व गावनिहाय पथकांची स्थापना करण्यात येऊन दरदिवशी किमान ५० घरामधील व्यक्तींची चौकशी तसेच पल्स ऑक्सीमीटर व थर्मलगणच्या सहाय्याने तपासणी करण्याचे नियोजन करण्यात यावे. या मोहीम कालावधीमध्ये प्रत्येक व्यक्तीस आरोग्य शिक्षण व कोविड प्रतिबंधाचे संदेश द्यावेत. ही संपूर्ण मोहिम स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने राबविण्यात येणार असून मोहिमेचा शुभारंभ गाव, वॉर्ड, तालुका व जिल्हा स्तरावर करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे असेही त्यांनी सूचित केले.

कळंब पालिका प्लाझ्मा देणा-यांसाठी टेस्टचा खर्च देणार

ताज्या बातम्या

यूपी सह मध्यप्रदेश,राजस्थान मध्ये बलात्काराच्या घटना उघडकीस

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील संतापानंतर मागील २४ तासांत देशातील विविध भागांतून बरीच प्रकरणे बाहेर आली आहेत. यूपीसह राजस्थान आणि मध्य प्रदेशात सामूहिक बलात्काराच्या घटना...

लातुरात तरूणाचा खून

लातूर : सिध्देश्वर मंदिराच्या परिसरात २५ वर्षीय तरूणाच्या डोक्यात पाठीमागून मारून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९...

देशात १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल

नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउनच्या बंधनातून जात असून, केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार सुरू करण्याबरोबरच विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियम शिथिल...

देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला !

नवी दिल्ली : भारतात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे आतापर्यंत ६२ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता कोरोना व्हायरससंदर्भात...

आटापिटा लसीच्या यशासाठी

जगभरात कोरोना व्हायरसचा धुडगूस सुरूच आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. अशा वेळी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अशा प्रयत्नांना मानसिक बळ...

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत सातत्याने जे वास्तव समोर येत आहे, त्यामुळे चंदेरी पडद्याच्या मागे लपलेला कचरा समोर आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमपासून अंडरवर्ल्डच्या...

महिलाशक्ती लढाऊ भूमिकेत!

कोणत्याही देशाची सुरक्षितता त्या देशाच्या लष्करावर अवलंबून असते. लष्कर जितके शक्तिशाली आणि मजबूत असेल, तितका तो देश सुरक्षित असतो. भारताचे लष्कर अत्यंत शक्तिशाली असून,...

साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज भरले शंभर टक्के

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : सप्टेबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज शंभर टक्के भरले तर साकोळ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत...

पानगाव येथील दिव्यांगांना मिळाले दीढ लाख रुपये

पानगाव : मनसेचे ग्रापंचयात सदस्य इम्रान मणियार, चेतन चौहान व दिव्यांगांनी पानगावचे ग्रामविकास अधिकारी जी. डी. टकले यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. दिव्यांगांचा निधी...

भांडारकर संस्था हल्ला प्रकरणातील शिवशंकर होनराव आर्थिक अडचणीत

कळंब : भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जी कारवाई करण्यात आली, त्यामध्ये दाभा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणचे सहा क्रांतिवीर सहभागी झाले...

आणखीन बातम्या

लातुरात तरूणाचा खून

लातूर : सिध्देश्वर मंदिराच्या परिसरात २५ वर्षीय तरूणाच्या डोक्यात पाठीमागून मारून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९...

साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज भरले शंभर टक्के

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : सप्टेबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज शंभर टक्के भरले तर साकोळ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत...

पानगाव येथील दिव्यांगांना मिळाले दीढ लाख रुपये

पानगाव : मनसेचे ग्रापंचयात सदस्य इम्रान मणियार, चेतन चौहान व दिव्यांगांनी पानगावचे ग्रामविकास अधिकारी जी. डी. टकले यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. दिव्यांगांचा निधी...

कुटुंब तपासणी मोहिमेतून तयार होणार लातुरची आरोग्य सुची – उपमहापौर

लातूर : लातूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात माझे कुटुंब मानसी जबाबदारी मोहीम राबवली जात असून या माध्यमातून प्रत्येक घरात आरोग्य तपासणी केली जात आहे यातून शहरातील...

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा आजपासून

लातूर : महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्यामार्फत एमएचसीईटी परिक्षा आज दि. १ ते ९ ऑक्टोंबर २०२० या कालावधीत...

मनरेगातून ग्रामविकास’ साधण्यासाठी हवी जागरूकता

लातूर : मनरेगाच्या माध्यमातून आपण गावाचा सर्वांगीण विकास करू शकतो, याची माहिती सरपंचांनी करून घेतली पाहिजे. त्यासाठी सरपंचांमध्ये जागरूकता वाढायला हवी. त्यांनी मनरेगाचा सूक्ष्म...

किल्लारीत भुकंपात मरण पावलेल्या स्मृती स्तंभास आभिवादन

किल्लारी : सकाळी 8 वाजता जुने किल्लारी येथे समृती स्तंभाला आ.आभिमन्यु पवार तहसीलदार शोभा पुजारी , सरपंच शौला लोहार सपोनी विनोद मेञेवार शंकरराव परसाळगे...

लातूर जिल्ह्यात आणखी २१७ रुग्ण वाढले; आणखी ५ बाधितांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची रोज नव्याने भर पडत आहे. मात्र, मागच्या काही दिवसांत रुग्णांची संख्या घटल्याचे चित्र होते. मात्र, आज आणखी २१७ नवे...

३० सप्टेंबरची काळ रात्र

किल्लारी (महेश उस्तुरे) : २७ वर्षापूर्वी ३० सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन करुन शांत झालेल्या किल्लारी व परिसरात उष:काल होता होता काळराञ झाली होती. भूकंपामुळे...

अतिवृष्टीने तळेगाव-बोरी रस्त्यावरील पूल गेला वाहून

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील तळेगाव बोरी परिसरात झालेल्या अतिवृष्टीने नाल्याला पूर येऊन पाण्याच्या प्रवाहामुळे मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहतुकीला...
1,273FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...