23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeलातूरमाझा मताधिकार गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा

माझा मताधिकार गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भारुन जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरु केलेली सार्वजनिक गणेशोत्वाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरिरीने जपतो आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने माझा गणेशोत्सव माझा मताधिकार या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्षे आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच वैयक्तिकरित्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभाग होता येणार आहे.

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकारतात, तसेच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. सार्वजनिक मंडळाच्या देखाव्यांच्या माध्यमातून आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीद्वारे सामाजिक संदेशदेखील दिले जातात. याच धर्तीवर माझा गणेशोत्सव माझा मताधिकार या स्पर्धेसाठी फोटो आणि ध्वनिचित्रफित हे साहित्य पाठवावयाचे आहे. मताधिकार हा १८ वर्षावरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांने आपले नाव मतदार यादीत नोंदविणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधारकार्ड जोडणे हे सुत्र केंद्रस्थानी ठेवून मंडळांना देखाव्याच्या माध्यमातून, तर घरगुती पातळीवर गणेश-मखराची सजावट, गेणश दर्शनासाठी घरी येणा-या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरुकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे व इतर अमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यासारख्या विषयावर आपल्या देखाव्या सजावटीतून जागृती करता येऊ शकते.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://ceo.maharashtra.gov समाज माध्यमावर सदर स्पर्धेची सविस्तर नियमावली देण्यात आलेली आहे. गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी दि. ३१ ऑगस्ट, ते दि. ९ सप्टेंबर या कालाधीतhtpp://forms.gle./6jfuU4YSRZ6AU7  या गुगल अर्जावरील माहिती भरुन आपल्या देखावा-सजावटीचे साहित्य पाठवावयचे आहे. या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत मतदार ओळखपत्राला आधार कार्डाची जोडणी, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या नवीन सुधारणान्वये मतदार नोंदणीसाठी लागू झालेल्या चार अर्हता तारखा यासाठी प्रसार – प्रचार केला जावा, आणि अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनीही केले आहे. वैयक्तिक (घरगुती गणेशोत्सव सजावट), सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अशा दोन्हींसाठी स्पर्धेचे नियम या स्पर्धा वैयक्तिक (घरगुती गणेशोत्सव सजावट) आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अशा दोन्हींसाठी आहे. सदर स्पर्धेत घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी पुढीलप्रमाणे साहित्य पाठवावेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या