27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरमाझा गाव माझी जबाबदारी मी समृद्ध तर गाव समृद्ध पुस्तकाचे प्रकाशन

माझा गाव माझी जबाबदारी मी समृद्ध तर गाव समृद्ध पुस्तकाचे प्रकाशन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
रविंद्र इंगोले यांनी नरेगावर लिखीत माझा गाव माझी जबाबदारी मी समृद्ध तर गाव समृद्ध पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रोहयो अप्पर मुख्य सचिव नंदकुमार, कृषिचे प्रधान सचिव एकनाथ डवले, राज्य विक्रीकर विभागाचे सहआयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी पृथ्वीराज, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, आमदार अभिमन्यू पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय गिरी व इतर मान्यवराच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, शेतकरी, महिला बचत गट उपस्थित होते. रवींद्र इंगोले जलदुत तथा मनरेगा राज्य प्रशिक्षक हे प्रत्यक्ष कृतिशील प्रशिक्षक असून त्यांच्या अनेक वर्षाचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा अनुभव आहे.

सदर पुस्तक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर लिखित असून त्यामध्ये ते ३६ मुद्द्यावर चर्चा केलेली आहे. या पुस्तकामध्ये मनरेगाची दशसूत्री, गावाचे मनरेगा आरोग्य कसे काढावे, २६२ प्रकारची कामे, मजुराचे अधिकार व जबाबदा-या, अभिसरण समृद्धी बजेट, बिहार पॅटर्न, जैतदेही पॅटर्न, दक्षता समिती, रोजगार दिवस, रेशीम फळबाग शेती फुल शेती ड्रॅगन फ्रुट लागवड, बांधावर वृक्ष लागवड, मातोश्री शेत पाणंद रस्ते, शरद पवार ग्रामसमृद्धी, योजना १ ते ७ रजिस्टर, मनरेगा प्रशिक्षण तंत्र, मनरेगा वर्गीकरण, मनरेगातून समृद्ध दावतपूर, मनरेगा दश वार्षिक आराखडा, महत्वाचे शासन निर्णय, मनरेगा प्रश्नपत्रिका इस्टिमेट मनरेगा सापसीडी मनरेगा यशोगाथा मनरेगाची पंचसूत्री, जागर मनरेगाचा इत्यादी विषयी महिती दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या