26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरनागपंचमीचा सण कोरोनाच्या सावटाखाली घरीच साजरा

नागपंचमीचा सण कोरोनाच्या सावटाखाली घरीच साजरा

एकमत ऑनलाईन

पोहरेगाव : संस्कृती ही सण आणि उत्सवप्रिय आहे. आपल्या देशाच्या वेगवेगळया भागात वेगवेगळे सण, उत्सव, प्रथा, परंपरेने साजरी होतात. आपले अनेक सण, उत्सव वा प्रथा- परंपरांचा संबंध हा निसर्गचक्राशी जोडलेला आढळतो. परंतु कित्येक वर्षानंतर चालत आलेल्या श्रावण मासातील पहिल्या सणाला कोरोनाचे ग्रहण लागल्याने नागपंचमीचा सण यावर्षी घरच्या घरीच साजरा करण्यात आला.

श्रावण मासातील पहिले सण म्हणुन प्रामुख्याने भारतीय संस्कृतीत नागपंचमी सणाला महत्वाचे स्थान आहे. गावाकडे ‘नागपंचमी’ म्हणजे लहान मुलांपासून ते आबालवृद्ध, मुली, स्त्रिया सर्वांसाठीच आनंददायी असलेली पाहावयास मिळायची. कारण ग्रामीण भागात नवीन लग्न झालेल्या मुलींना सासरहून, माहेरला येण्याची संधी उपलब्ध करून देणारा तो पहिलाच सण. परंतु या महामारीने या सणवार ग्रहण लावल्याचे दिसून येत आहे. दिवेसंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सगळीकडे शुकशुकाट व भयाण शांतता पसरलेली पाहावयास मिळत आहे. त्यामुळे एक, दोन नव्हे तर पाचव्यांदा सलग जिल्हधिकारी यांनी जिल्हयात लॉकडाऊन जारी केला आहे.

ग्रामीण भागात नागपंचमीच्या दिवशी सकाळीच घरातील मातीच्या भिंती पोतारून त्यावर एक चौकट तयार केली जायची. त्यानंतर भिंत ओली असतांनाच त्यावर वलयाकार बोटे ओढून सापाच्या आकार काढले जायचे, मध्ये कुंकवाची बोटे दिली जायची. ते म्हणजे सापाची प्रतिकृती की यांमध्ये पूजेसाठी तयार केलेला नागोबा. गावाच्या बाहेर हेमाडपंथी बांधणीचे महादेवाचे मंदिर.

पंचमीच्या दिवशी सकाळी गुलाल नारळाने एकदा शंकरजीची पूजा केली की दिवसभर झोके घेण्यास मोकळे असायचे. पूर्वी नागपंचमीच्या दिवशी गावात ठिकठिकाणी झोके बांधलेले असायचे. गावातील जी काही मोठी झाडं होती जसे ग्रामपंचायत समोर असलेला पिंपळ, चौकातील लिंब, मंदिराच्या समोर असलेला लिंब, मंदिराच्या मागील बाजूला असलेले वडाचे झाड पंरतु आता ना कुठे झाडे राहिली ना कोरोनाने माणसे घराच्या बाहेर निघाली. त्यामुळे हा सण सर्व ग्रामीण भागात घरातच साजरा करण्याची वेळ कोरोनामुळे आली आहे.

सणांचे महत्व कमी होतेय
झोक्याला जसे चढ-उतार असतात तसेच आयुष्याला सुद्धा सुख-दु:खाचे चढ-उतार असतात. याची शिकवण देण्यासाठीच कदाचित ही झोक्याची प्रथा सुरू झालेली असावी. त्यामुळे या पिढीच्या मुलांच्या मनातून या सणांचे महत्व आपोआप कमी होत चालले आहे. शिवाय कोरोना या बिमारीने देश-विदेशातील माणसे जवळ आली खरी परंतु हे सण, उत्सव सावटाखाली गेल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे.

ग्रामीण भागात यंदा नागपंचमी नावालाच
माहिती तंत्रज्ञान युगात मोबाईलमुळे नवविवाहितांच्या सासरकडील गुजगोष्टी ऐकण्यातील उत्सुकता केंव्हाच संपली आहे. पूर्वीची नागपंचमी ही आता इतिहासजमा झाली आहे. शिवाय कोरोनाने आणखी त्या सणाला ग्रहण लावल्याने ग्रामीण भागात यंदा नागपंचमी नावालाच उरल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.

Read More  शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृहात १५० व्यक्तींची व्यवस्था

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या