26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeलातूरनाले सफाईची कामे युद्धपातळीवर सुरू

नाले सफाईची कामे युद्धपातळीवर सुरू

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : नगरपंचायतच्या वतीने स्वच्छता विभागाकडून शहरात मान्सूनपुर्व नाले सफाईची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत ८० टक्के काम पुर्ण झाले असून उर्वरित कामे चार दिवसात मार्गी लागेल.यासाठी जेसीबींसह कर्मचारी टीम कार्यरत आहे. यासाठी अधिकारी, कर्मचा-याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून दरवर्षी पावसाळ्यापुर्वी नगरपंचायतच्या वतीने नालेसफाईची कामे होत असल्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

या नालेसफाई अभियानासाठी नगराध्यक्षा सौ.मायावती धुमाळे, उपाध्यक्षा सौ.सषमाताई मठपती व मुख्याधिकारी मंगेश शिंदे, आरोग्य व स्वच्छता सभापती चंद्रकलाबाई शिवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी ज्योती वलांडे यांच्यांसह कर्मचारी राजू बोराळे, राम लांडगे आदी कर्मचारी या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान शहराचा विस्तार मोठा आहे.त्यात जुना गावभाग दाटीवाटीचा असल्याने पावसाळ्यात दगड,गोटे, वाळु व माती मोठ्या प्रमाणात नाले, गटारांमध्ये बसून ती भरली जातात. त्यातच परिसरातील प्लॉस्टिक बॉटल्स, कचराही अडकल्याने ते नाले, गटारी तुंबून रस्त्यावर पाणी येऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून नगरपंचायतने नाले सफाईची मोहीम हाती घेण्यात आली असून गटारी व नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साठलेला गाळ व कचरा बाहेर काढून स्वच्छता व साफसफाई करण्यात येत आहे. यासाठी अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

शहरातील जवळपास ८० टक्के साफसफाईची कामे झाले आहेत. राहिलेल्या भागांतील नाले सफाईची कामे लवकरच मार्गी लावले जाणार आहे. नाले सफाईसाठी जेसीबीसह कर्मचारी कार्यरत असून ज्या ठिकाणी जेसीबी पोहोचू शकत नाही तेथे नगरपंचायत सफाई कामगारांमार्फत नालेसफाई केली जात असल्याचे नगराध्यक्षा सौ. मायावती धुमाळे व मुख्याधिकारी मंगेश शिंदे,आरोग्य व स्वच्छता सभापती चंद्रकलाबाई शिवणे यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या