लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांना सर्वोच्च रोटरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लातूर येथील दयानंद कॉलेजमध्ये झालेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या चौदाव्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स उत्सव कार्यक्रमात नंदकुमार गादेवार यांना पंतप्रधान कार्यालयातील सल्लागार व माजी राजदूत डॉ. दीपक होरा यांच्या हस्ते व अॅड. गजेंद्रसिंग धामा, रोटरीचे गव्हर्नर डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे,
महेंद्र खंडागळे यांच्या सह प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या समक्ष सर्वोच्च रोटरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या प्रसंगी महासभेचे सचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष सुभाषराव कन्नावार, भानुदास वट्टमवार, एकनाथराव मामडे, प्रदीप कोकडवार, नरेंद्र येरावार, सुरेश पेन्शलवार, बालाजी पेन्शलवार, दीपक कोटलवार, अनिरुद्ध राजूरकर, माणिक बट्टेवार, सौ अंजली कोटलवार, मनीष मानिकवार, वैभव झरकर, महेश पत्तेवार, अजय गादेवार, चंद्रकांत गुंडाळे, व्यंकटेश गादेवार आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते,अशी माहिती लातूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अविनाश बट्टेवार यांनी दिली.