37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeलातूरनराधम पित्यास १० वर्षांची शिक्षा

नराधम पित्यास १० वर्षांची शिक्षा

एकमत ऑनलाईन

रेणापूर : जिवे मारण्याची धमकी देत आपल्या अल्पवयीन मुलीवर सतत एक वर्ष अत्याचार करणा-या त्या’ नराधम वडिलास लातूर येथील सत्र न्यायालयाने गुरुवार दि. १२ रोजी आरोपीस १० वर्षाची कठोर शिक्षा व ५०० रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

मुळचा कळंब येथील रहिवाशी असलेला महंम्मद इब्राहीम सय्यद (फकीर) ५५ वर्षे हा ंिपपळफाटा रेणापूर येथील परिसरात पाल ठोकून गेल्या ८ वर्षापासून पत्नी , अल्पवयीन मुलगी , व अन्य लहान मुलगा, मुलीसह वास्तव्यास होता. भिक्षा मागून उपजिविका भागावित असे. दरम्यान मे २०२० मध्ये त्याची पत्नी व अन्य दोन मुले, दोन मुली भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेले असताना व अल्पवयीन मुलगी झोपडीत एकटीच असल्याचा फायदा घेऊन या नराधाम बापाने पोटच्या मुलीवर अत्याचार केला.

सदर घटना तू आईला व इतरांना सांगितल्यास तुला व तुझ्या आईस जिवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे पिडीत मुलीने घडलेली घटना कोणालाही सांगितली नाही. त्यामुळे या नराधाम बापाने मे २०२० ते मे २०२१ या कालावधीत आई व इतर मुले भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेल्यावर वारंवार संधी साधून व मारण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार करीत असे. या दरम्यान पिडीत मुलीच्या पोटात दुखत असल्याचे आपल्या आईस सांगितले नंतर आईने सदर मुलीस एका रुग्णालयात उपाचारासाठी घेऊन गेले त्यानंतर डॉक्टरांना याचा संशय आल्यावरून या मुलीची तपासणी केली.

यात ही अल्पवयीन मुलगी अंदा जे ५ ते ६ महिन्याची गरोदर असल्याचे आढळून आले. पिडित मुलीच्या आईने याबाबत विचारले असता बापानेच मला व तुला जिवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचे सांगितले .यावरून पिडित मुलीच्या आईने गुरुवारी (दि. १ जुलै २०२१ ) रोजी रेणापुर पोलिस ठाण्यात पती विरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून नराधाम अत्याचारी बापा विरुद्ध गुरंन २७९ / २१ कलम ३७६, ( २ ), ( फ) ( एन ) ५०६ भादवि सह बालकांचे बाललैंिगक अपराधापासून सरंक्षण सन २०१२च्या कलमा नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या प्रकरणाचे तपास अमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती निर्मळ , श्रीराम माचेवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार गुळभेले , पोलीस कर्मचारी अभिजीत थोरात, धर्मवीर शिंदे, यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करीत दोषारोप पत्र जलद गती न्यायालयात दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी होऊन फिर्यादी आई, पिडीत मुलगी व अन्य पाच साक्षीदाराची साक्ष व सबळ पुराव्यावरून नराधम बापास १० वर्षाची कठोर शिक्षा व ५०० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या