27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरनिवृत्तीवेतनधारक आणि शासकीय योजना लाभधारकांना राष्ट्रीयकृत बँका घरपोच सेवा देणार

निवृत्तीवेतनधारक आणि शासकीय योजना लाभधारकांना राष्ट्रीयकृत बँका घरपोच सेवा देणार

एकमत ऑनलाईन

लातूर : कोविड-१९ प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊन काळात पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार निवृत्तीवेतनधारक आणि संजय गांधी व इतर शासकीय योजनेतील लाभधारकांना घरपोच सेवा देण्याचे राष्ट्रीयकृ बँकांनी मान्य केले असून त्यासाठी त्यांच्याकडून शहराच्या निरनिराळ्या भागात विविध संस्थांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे.

लॉकडाऊन काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे, स्वत:चे वाहन घेऊनही घराबाहेर पडता येत नाही, बँकेत जाऊन पैसे काढता येत नाहीत. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार निवृत्तीवेतन धारकांच्या वतीने पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे करण्यात आली होती. निवृत्तीवेतन धारकांच्या या तक्रारींची तातडीने दखल घेऊन पालकमंत्री देशमुख यांनी महापौर विक्रांत गोजमगुंडे व आयुक्त देविदास टेकाळे यांच्याशी संपर्क करुन ही गैरसोय दूर करण्याच्या सूचना केल्या होत्या. सोमवारी महापौर आणि आयुक्त टेकाळे यांनी या संदर्भाने राष्ट्रीयकृत बँक अधिका-यांशी संपर्क करुन त्यांची बैठक घेतली.

या बैठकीदरम्यान निवृत्तीवेतनधारक तसेच शासकीय योजनेतील लाभधारकांना घरपोच सेवा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी संबंधित बँकाकडून शहराच्या निरनिराळ्या भागात विविध संस्थामार्फत संपर्क प्रतिनिधी नेमले असून त्यांचा संपर्क पत्ता आणि फोन नंबर जाहीर करण्यात आले आहेत. लाभधारकांनी या प्रतिनिधींना संपर्क केल्यास त्यांना हवी ती रक्कम घरपोच मिळणार आहे.

बँक ऑफ बडोदाच्या वतीने राकेश के लातूर ९५३५२७५०६८ हे नोडल अधिकारी राहणार असून प्रशांत श्रीधर भाटगावे (जुना औसा रोड) ८६०५५९६४५९, शुभम शैलेश राऊत (चंद्रनगर) ९४०४0७२००२७, राजेंद्र बालाजी देबडवार (बार्शी रोड) ९०९६३२७२४०, निलेश निवृत्ती पोलकेवार (शिवनगर) ९४२३३४६६०४, पिराजी मोहन सुर्यवंशी (म्हाडा कॉलनी) ९७६७७८७६२४, मनोज भानुदास काळे (विवेकानंद चौक) ९७६६९११२९२ हे संपर्क प्रतिनिधी असतील.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने किशोर वाहने ८२३७७७९९०१ हे नोडल अधिकारी राहणार असून श्रीकृष्ण गजानन कुलकर्णी (आदर्श कॉलनी) ८७८८४०१०६७, ऋषिकेश दीपक पांडे ( औसा रोड) ९९७०८४९५०३, अमोल रमाकांत जोशी (आदर्श कॉलनी) ९४२११९५१२३, विद्या विक्रांत तोडकर (आंबेजोगाई रोड) ९८६०२०७६६०, नितीन प्रल्हाद कांबळे (आर्वी ) ८२८१०७२८१०, हे संपर्क प्रतिनिधी राहणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने सुनील जेजुरकर ९९७०७२९९४० हे नोडल ऑफिसर राहणार असून अमर पिंपरे ८३२९७३३३२१, दिलीप हांडे ९५०३११०१०१, सुरेश गवळी ९८६०१३१३४२, केशव भांगिरे ९०२१४२६९२६ सर्व लातूर संपर्क प्रतिनिधी राहणार आहेत. यांच्या फोन नंबरवर निवृत्तीवेतनधारक आणि शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांनी फोन केल्यास त्यांना हवी असलेली रक्कम घरपोच मिळणार आहे.

वृद्धांना मिळणार आधार
लातूर जिल्ह्यात सेवानिवृत्ती वेतनधारक आणि विविध शासकीय योजना लाभार्थ्यांची संख्या हजारोंपेक्षा अधिक आहे. सध्या कोरोनामुळे या वृद्धांना घराबाहेर पडता येत नाही. बँकांत जाऊन सेवानिवृत्ती वेतन किंवा शासकीय योजनांचे अनुदान घेता येत नाही. ही बाब लक्षात घेता पालकमंंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केलेल्या सूचनेनूसार आता वृद्धांना घरपोच सेवा मिळणार असल्यामुळे त्यांना खुप मोठा आधार मिळणार आहे.

Read More  सोलापूर ग्रामीणमधील मुलांनी मारली बाजी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या