24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरनिसर्ग सृष्टी म्हणजेच भगवंताचा प्रसाद होय

निसर्ग सृष्टी म्हणजेच भगवंताचा प्रसाद होय

एकमत ऑनलाईन

अहमदपूर :सर्व विश्वामध्ये भगवंताचे रूप एकच असून सर्व निसर्ग सृष्टी मध्ये तो चराचरात व्यापला असल्याचे सांगून निसर्ग सृष्टी म्हणजेच भगवंताचा प्रसाद असल्याचे प्रतिपादन वीर संस्थेंचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांनी केले. दि.१७ रोजी वैशाखी पौर्णिमेनिमित्त भक्तीस्थळ येथे आयोजित राष्ट्रसंत परम पूज्य डॉ. शिवंिलंग शिवाचार्य महाराज पालखी उत्सव सोहळ्यात आचार्य गुरुराज स्वामी आशीर्वचन करताना ते बोलत होते. यावेळी मंगल पिठावर वीर मठ संस्थान निलंगा येथील संगण बसव स्वामीसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आचार्य गुरुराज स्वामी पुढे बोलताना म्हणाले की, सद्यस्थितीला वेगवेगळ्या वातावरणातील प्रदूषणामुळे व व्हायरसमुळे पृथ्वीसह धरतीमाता संपूर्णपणे संकटात सापडली असून सदरचे संकट दूर करण्यासाठी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी झाडे लावा निसर्ग वाचवा अध्यात्मिक सुखासाठी मानवी सत्संगाचा सर्व मानवजातीने अंगीकार करावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी संगण बसव स्वामी यांचेही मार्गदर्शन झाले. .या पंचमी महोत्सवात विविध गावांचे भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या महोत्सवात भक्ती स्थळाच्या सचिव सुप्रियाताई घोटे ,ओमप्रकाश पुणे, शिवकुमार उटगे ,रामंिलग तत्तापुरे, राजकुमार कल्याणी, विनोद ंिहगणे ,सतीश लोहारे, शीलाताई शेटकार, शिवंिलंग पाटील किनीकर, संजय ऊस्तुरगे, संतोष चवले, शिवकुमार गंजगाले, महिलासह भक्त उपस्थित होते. या महोत्सवाचा समारोप मंगनाळी ग्रामस्थांच्यावतीने उपस्थित सर्व भक्तांना रस पोळीच्या महाप्रसादाने करण्यात आला

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या