26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरनिसर्गाची अतिवृष्ट्टी तर प्रशासनाकडून वक्रदृष्टी

निसर्गाची अतिवृष्ट्टी तर प्रशासनाकडून वक्रदृष्टी

एकमत ऑनलाईन

चाकूर : उन्हाळ्यात जीवाची लाही लाही सहन करीत पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपून बळीराजा खरिपाच्या पेरणीला सज्ज झाला असतानाच यंदा पाऊसच उशिरा झाल्यामुळे पेरणीला बिलंब झाला, दि. ७ जूनला जरी मृग नक्षत्रास प्रारंभ झाला असले तरी पेरण्या मात्र तालुक्यात १५- २० जूनच्या नंतरच सुरू झाल्या. पिकांचा मोड कोवळी असतानाच चाकूर तालुक्यात यंदा पावसाने चांगलाच कहर केला.

सर्वच मंडळात अतिवृष्टी सदृश स्थिती निर्माण झाली असून सध्याची स्थिती पाहता निसर्गाने केली केली अतिवृष्टी, प्रशासनाकडून का होतेय वक्रदृष्टी? असा सवाल पुढे येत आहे. अतिपावसाने खरिपातील पिके झाली मातीमोल, पण प्रशासनाकडून पंचनामे केली जात नाहीत. गेले काही दिवसांपासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे छोट्या मोठ्या तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ओढे, नाले, नद्या तुडुंब भरून वाहत असल्याने सर्वत्र पाणी झाल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. शेतशिवारांचे पंचनामे करून शासन व प्रशासन शेतक-यांना आधार देईल अशी आशा होती परंतु ती फोल ठरल्याचे दिसून येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या