27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरजळकोट येथे वनविभागाच्या कार्यालयाची गरज

जळकोट येथे वनविभागाच्या कार्यालयाची गरज

एकमत ऑनलाईन

ओमकार सोनटक्के  जळकोट : तालुका पुर्वीच डोंगरी तालुका आहे, येथे लावलेले झाडे टिकण्यासाठी खुप वर्षे लागतात असे असले तरी या तालुक्यात वृक्षाची लागवड ही अंत्यत नगण्य आहे़ त्यामुळे येणाºया कांही वर्षात जळकोट तालुक्याचे रूपांतर वाळवंटी तालुक्यात होण्यास वेळ लागणार नाही़ जळकोट येथे स्वतंत्र असे वनविभागाचे कार्यालय नाही़ जळकोट तालुका ही अहमदपूर येथील विभागास जोडण्यात आला आहे़ त्यामुळे येथील अधिकाºयांना जळकोटला येण्यास नेहमी वेळ मिळत नाही़त्यामुळे वृक्षतोडीचे प्रमाण अधिक आहे, जर जळकोट तालुक्यातील वृक्ष टिकवायचे असतील तर या ठिकाणी स्वतंत्र वनविभागाचे कार्यालय सुरू करण्याची गरज होती, मात्र शासनाने २१ वर्षानंतरही या ठिकाणी वनविभागाचे कार्यालय सुरू करण्याची तसदी घेतली नाही.

जळकोट तालुक्यात वनसंपदा ही खुप कमी आहे, तालुक्यात कडूलिंब, बाभुळ, हेळा, बोर, जांभूळ, सागवान, आंबा, या वृक्षाची संख्या खुप मोठ्या प्रमाणात आहे. हा तालुका हा डोंगरी भाग आहे़ त्यामुळे कुठेतरी ही वृक्ष पहावयास मिळत आहेत, अशात या वृक्षावर झाडे तोडणाºयांची नजर पडल्यामुळे या झाडावर मोठ्या प्रमाणात कुºहाड चालवली जात आहे. जळकोट तालुक्यातून दररोज शेकडो टन लाकूड तालुुक्याबाहेर नेले जात आहे.

जळकोट तालुक्यात सरासरीच्या खुप कमी पाऊस पडतो आहे़ त्यामुळे नैसर्गीकरित्या वृक्षवाढ कमी प्रमाणात होत आहे, अशातच वृक्षतोड खुप वाढली आहे. त्यामुळेच तालुक्यात वृक्षांची संख्या खुप कमी झाली. तसेच जळकोटला स्वतंत्र वनविभागाचे कार्यालय नसल्यामुळे वृक्ष तोडणाºयास याची भीती नसल्यामुळे वृक्ष तोडण्याचे प्रमाण वाढले आहे.
तालुक्यातील सुल्लाळी, डोंगरगाव, मरसांगवी, अतनूर, गव्हाण,चिंचोली, परिसरात मोठ्या प्रमाणात सागवाण होते, हे सागवान वनविभागाच्या अखत्यारीत येते, असे असले तरी या सागवाणांची संख्याही कमी होत आहे. अहमदपूर वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी या ठिकाणी वेळेवर पोहचू शकत नाही.

या कारणाने या ठिकाणी सागवान तोडदेखील वाढली आहे. जळकोट तालुक्यात गत अनेक वर्षांपासून सतत दुष्काळ आहे़ यामुळे शेतीत काय पिकले नाही, अशा परिस्थितीत कुटूंब कसे चालवायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे़ शासनाची तोकडी मदत पुरेनाशी झाली, शेतक-यांना नाईलाजास्तव आपल्या शेताताील झाडे विकण्याची वेळ आली आहे. यामुळे अशा शेतकºयांना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

जळकोट येथे वनविभागाचे कार्यालयच नाही यामुळे येथे कर्मचारीही कमीच आहेत़ जर जळकोट तालुका वाळवंट होण्यापासून वाचवायचा असेल तर या ठिकाणी वनविभागाचे कार्यालय त्वरीत सुरू करणे गरजेचे आहे तसेच जळकोट येथै वनविभागाचे कार्यालय सुरू व्हावे यासाठी राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी आता होत आहे.

Read More  आरोग्य कर्मचा-यांना लागण झाल्याने खळबळ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या