25.2 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeलातूरलातूर शहरातील ४५ केंद्रांवर होणार ‘नीट’ परीक्षा

लातूर शहरातील ४५ केंद्रांवर होणार ‘नीट’ परीक्षा

एकमत ऑनलाईन

लातूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षा (नीट) दि. १३ सप्टेंबर रोजी होणार असून त्यासाठी लातूर शहरामध्ये एकुण ४५ केंद्रांची तयारी सुरु झाली आहे. लातूर जिल्ह्यातून १७ हजार विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. एका हॉलमध्ये १२ परीक्षार्थी राहतील. प्रत्येक परीक्षार्थ्यांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर असेल, तत्पुर्वी संपूर्ण केंद्र परिसर निर्जतुकीकरण केले जाणार आहे.

दि. १३ सप्टेंबर रोजी परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत असतील तरी परिक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी ११ ते १.३० या वेळेत नोंदणी करावी लागणार आहे. दुपारी दुपारी १.३० वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये घेतले जाणार नाही. सकाळी ११ ते दुपारी १.३० या ोळो प्रत्येक विद्यार्थ्याचे ऑक्सिमीटरने ऑक्सिजन लेव्हल आणि पल्स रेट तपासले जाणार आहेत. प्रत्येक केंद्रावर दोन आयसोलेशन वॉर्डही स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामध्ये बेडची व्यवस्था असेल. परीक्षा केंद्रावर येताना विद्यार्थ्याने ५० एमएल सॅनिटायझर, पाण्याची बॉटल स्वत: आणायची आहे.

घरुन मास्क आणलेला असला तरी परीक्षा केंद्रावर व्यवस्थापनाकडून नवीन निर्जंतुकीकरण केलेला मास्क दिला जाणार आहे. परीक्षार्थ्यांनी सकाळी ११ वाजताच परीक्षा केंद्रावर पोहोचून नोंदणी करुन ऑक्सिमीटरने तपसणी करुन घ्यवी लागणार आहे. शहरातील नियुक्त केलेल्या परीक्षत्त केंद्रावर तयारी सुरु आहे. दयानंद कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी तसेच राजर्षी शाहू महाविद्यालय, सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय हे परीक्षा केंद्र आहेत. या परीक्षा केंद्रांव२ शासनाच्या अंतर्गत असलेली नीेट परीक्षा व्यवस्थापन समिती देखरेखीखाली व्यवस्था सूरु आहे, अशी माहिती परीक्षेचे जिल्हा समन्वयक झा यांनी दिली.

एक देश, एकच मतदार यादी करण्याचे काम सुरू होणार : पंतप्रधान कार्यालयाचे संकेत

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या