18.5 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरलातूरच्या ‘केजीएन’मध्ये टेसाद्वारे पुत्रप्राप्ती

लातूरच्या ‘केजीएन’मध्ये टेसाद्वारे पुत्रप्राप्ती

एकमत ऑनलाईन

लातूर : येथील के. जी. एन. टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटल येथे टेसाद्वारे लग्नाच्य १४ वर्षांनंतर एक निपुत्रीक दांमत्यांना पुत्रप्राप्ती झाली आहे. या हॉस्पिटलने निपुत्रीक दांपत्यांना आई-बाबा होण्याची पूर्तता नेहमीच केली आहे. गेल्या २० वर्षांपासून आपल्या यशाची परंपरा अखंडपणे सुरु ठेवणारे हे मराठवाड्यातील एकमेव टेस्ट ट्युब बेबी सेंटर आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. अमीर शेख हे के. जी. एन. टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटलचे मुख्य संचालक आहेत. त्यांनी उपराबद्दल माहिती देताना सांगीतले की, हे दांपत्य कर्नाटक येथून साधारण दीड वर्षांपुर्वी आम्हाला येऊन भेटले होते. लग्नाला १४ वर्षे झाली होती. त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेतले होते. मात्र त्यांना आपत्य प्राप्त होत नव्हती. कारण त्यांना स्वत:चे जनुकीय बाळ हवे होते. त्यासाठी त्यांच्या भावनांचा आदर करुन पुढील उपचार करण्यात आले. दांपत्यांची सर्व तपासणी करुन टेसा टेस्ट ट्युब बेबी उपचार करण्याचा निर्णय घेतला. पुरुषाचे शुक्राणू व स्त्रीचे स्त्रीबीज शरिराबाहेर काढून त्याचे इक्सी करण्यात येते. कृत्रीम गर्भाशयामध्ये हे भु्रण ठेवले जाते. त्यानंतर योग्य वेळेस मातेच्या गर्भाशयात हे भ्रुण सोडण्यात येते. हीच टेसा पद्धती रुग्णावर करण्यात आली. मातेस थॉयराईडचा आजार असल्यामुळे तो नियंत्रणात ठेऊन गर्भधारणा करणारे दुसरे औषधोपचारसोबत दिले. पुढे ही गर्भधारणा यशस्वी झाली आणि निपुत्रीक जोडप्यास पुत्रप्राप्ती झाली.

याबाबत के. जी. एन. च्या मुख्य काऊन्सलर डॉ. रझिया शेख म्हणाल्या, टेस्ट ट्युब बेबीबाबत एक मोठा गैरसमज आहे. त्यामुळे आम्ही व्यवस्थीत समुपदेशन करतो आणि त्यांच्या भावनांचा आदर करुन पूर्ण पारदर्शकतेने उपचार करतो, असे सांगीतले. वंध्यत्वाकडून मातृत्वाकडे हे ब्रिदवाक्य जपण्यासाठी केजीएन टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटल नेहमीच बांधील आहे. वंध्यत्वाचा शाप निपुत्रीकांच्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी नवनवीन उपचार पद्धती येथे केली जाते. यासाठी भूलतज्ज्ञ डॉ. शशी पाटील, डॉ. अतीख शेख, डॉ. विशाल मैंदरकर व केजीएन आव्हीएफ टीमचे यांचे सहकार्य नेहमीच घेतले जाते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या