34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात रात्रीची संचार बंदी लागू

लातूर जिल्ह्यात रात्रीची संचार बंदी लागू

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांत कोविड-१९ रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे, कोविड-१९ च्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेले बहुतांश निर्बंध हटविण्यात आले असून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी लातूर शहर महानगरपालिका व उदगीर, औसा, निलंगा आणि अहमदपूर नगरपालिका हद्दीत दि. ३ मार्च रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करीत असल्याचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशात वैद्यकीय सेवा, मेडिकल्स, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आदी अत्यावश्यक जीवनावश्यक सेवा यांना सूट, सवलत देण्यात आलेली आहे. कोव्हीड-१९ प्रतिबंधात्मक व सुरक्षा नियम शारीरीक अंतर, फेसमास्कचा वापर, निर्जतुकीकरण, वैयक्तिक स्वच्छता ईत्यादी सावधगिरीच्या नियमांचा कोटेकारेपणे पालन करण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथरोग प्रतिबंधक कायदा, १८९७, अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम १८८ नुसार, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ तसेच महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२० च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे ही आदेशात नमूद केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दररोजच्या अहवालावरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रात्रीची संचारबंदी आजपासून पुढील आदेश येईपर्यंत रात्री ११ वाजल्यापासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे, असे नमुद करुन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. पुढे म्हणाले, महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील मोठी हॉटेल्स, पान टप-या, ढाब्यांवर रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. ती होऊ नये, हाही यामागचा उद्देश आहे. लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रेसंदर्भात जिल्हाधिकारी म्हणाले की, महाशिवरात्रेनिमित्त परंपरेने जे धार्मिक कार्यक्रम होतात ते मर्यादीत भक्तांच्या उपस्थितीत होणार आहेत. गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकासाठी ५ जणांना तर झेंडावंदनासाठी २० भक्तांना परवानगी असणार आहे.

जिल्ह्यातील ७०८ मृतांपैकी ५०८ जणांना इतर आजार
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आजपर्यंत लातूर जिल्ह्यातील ७०८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या ७०८ मृतांपैकी ५०८ जणांना इतर आजार होते तर २०० लोकांना पुर्वीच्या आजाराचा इतिहास नाही, असे नमुद करुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ३० हजार ४२१ कोरोना चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी २५ हजार ३९० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. २४ हजार ७९८ व्यक्ती उपचाराने बरे होऊन घरी परत गेले. आजघडीला ५९८ अ‍ॅटिव्ह केसेस आहेत.

जिल्ह्यातील २१३२५ जणांना दिली लस
लातूर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून आजपर्यंत २१ हजार ३२५ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्याचे नमुद करुन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश हरिदास म्हणाले, आरोग्य क्षेत्रात काम करणा-या १२ हजार ५०८ कर्मचा-यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. याच क्षेत्रातील ३९८८ कर्मचा-यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला तर ४८२९ फ्रंटलाईन वर्क्सना पहिला डोस देण्यात आला. असे एकुण २१ हजार ३२५ जणांना लस देण्यात आली. शासनाच्या सूचनेनूसार आता ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरीक व ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील १२ शासकीय केंद्रांतून ही लस दिली जात आहे. जिल्ह्यातील खाजगी १३ हॉस्पिटलपैकी अल्फा सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल, येलाले हॉस्पिटल, गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व देशपांडे हॉस्पिटलमध्ये लसीकरण केले जात आहे. दररोज किमान २०० नागरिकांना लस देण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.

कीर्ती ऑइल मिल व रेसिडेन्सी क्लबला ठोकले सील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या