30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home लातूर निलंगा, परिसरात अवैध धंदेवाईकांचा धुमाकूळ

निलंगा, परिसरात अवैध धंदेवाईकांचा धुमाकूळ

एकमत ऑनलाईन

निलंगा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अवैद्य व्यवसायाविरूद्ध दबाव आहे. अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत .मात्र पोलीसांच्या छापेमारी नंतरही निलंगा शहरांतील दोन मटका चालकाच्या एजंट शहरासह तालुक्यात सर्वत्र धुमाकूळ घालत आहेत. यामुळे जिल्हा पोलिस आधीक्षकांनाच निलंग्यातील मटका चालकांनी आव्हान दिल्याचे सर्वत्र चर्चिले जात आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पद्भार स्वीकारताच अवैध धंदे बंद करण्याची मोहीम जोमात सुरू केली . शिवाय अवैध धंदे संपूर्णत: बंद करण्यात येणार असल्याचे ठणकावले . त्यातच अवैध धंदावर लवकर आवर बसावा म्हणून एका पथाकाची नियुक्ती केली आणि अवैध धंदेवाल्याच्या छापेमारीस जोमाने सुरुवात झाली दरम्यान राज्यमंत्री संजय बनसोडे व आमदार अभीमन्यू पवार, यांनी संयुक्तपणे अवैध धंदे बंद करण्याविषयी ठाम भूमिका घेतली. यामुुळे तालुक्यातील कांही अवैध दारू विक्रेते , जुगार अड्डे चालक व मटका चालकांनी बदलत्या परिस्थितीनुसार अधिका-यांनी हात वरी केल्याने आपला बोरा बिस्तारा गुंडाळला आणि या व्यवसायिकांनी अवैध धंद्याचा गाशा गुंडाळला मात्र निलंगा येथील अधिका-यांच्या कृपाशीर्वादाने आजही खुलेआम मटका, जुगाराचे अड्डे, अवैद्य दारूविक्री, शहरातील गल्ली-बोळात जोमात चालू आहेत.

या परिसरातील मटका खेळणा-याना त्यांच्या गरजेनुसार मोबाईल मटक्यावर जोड- ओपन-क्लोज देऊन निलंगा येथील धंदेवाले खुलेआम धंदा करीत आहेत. शहरातील मुख्य चौका चौकात , भर रस्त्यावर , गल्ली बोळात , हॉटेल , पणटपरी , दुकानात कोरोना महामारीचे सर्व नियम धाब्यावर बसवून मटक्याची दुकानदारी थाटली आहे. मटका नावाचा जुगार गर्दी करून खेळला जात आहे.

भरवस्तीत जुगा-यांचा खेळ सुरूच
शहरातील भर वस्तीमध्ये रस्त्याच्या कडेला बसून मटक्याचे चार्ट टाकून मटका खेळणारे आकडेमोड करीत गणिते सोडवत गर्दी करीत असल्याने कोरोना महामारीचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.यात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने मटका खेळणारे कंगाल तर खेळविणारे माला-माल होत असल्याने मोल-मजुरदारांचे संसार दिवाळखोरीत उद्ध्वस्त होत आहेत . तरिही जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही चकवा देत येथील प्रशासन चेरीमेरीच्या नादात मटका चालकांना अभय देत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. यामुळे पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी होत आहे.

यूपीएससी प्रशिक्षणासाठी ‘सीईटी’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या