33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeलातूरनिलंगा बसस्थानक शौचालयाविना

निलंगा बसस्थानक शौचालयाविना

एकमत ऑनलाईन

निलंगा (लक्ष्मण पाटील) : येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस्थानाकाचे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने संबंधित गुत्तेदाराकडून जुने शौचालय पाडण्यात आले मात्र प्रवाशांची गैरसोय होऊनये म्हणून तात्पुरती कसलीच पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही म्हणून प्रवाशांची गैरसोय पाहून स्थानिक प्रशासनाने तात्काळ संबंधित गुत्तेदारास तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याबाबत सुचविले. आणि विभागीय कार्यालयास कळविले परंतु गुत्तेदार व विभागीय कार्यालयाने याकडे पाठ फिरविल्याने गत तीन महीन्यापासून प्रवाशांची बस्थानकात शौचालय नसल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ होत आहे.

पर्यायी तात्पुरती शौचालयाची व्यवस्था नेमकी कोणी करावी म्हणून गुत्तेदर व महामंडळाचे अधिकारी यांचे वांदे प्रवाशांच्या जिवाशी बेतल्याने प्रवाशातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा शहरामध्ये बस्थानकाची इमारत तयार होऊन शहराच्या वैभवात भर पडावी म्हणून पाच कोटीेचे बजेट मंजूर करून आणले. या कामास युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गती मिळाली. एमएसआरटीसीने पृथ्वी कंस्ट्रक्शन कंपनी नांदेड यांना काम दिले.

मोठा गाजावाजा करीत कामाची मार्च २०१९ मध्ये सुरुवात झाली. याकामाकरिता संबंधित गुत्तेदारास काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला. दरम्यान मार्च २०२० कोविड १९ या संसर्गजन्य रोगाने सर्वत्र थैमान घातल्याने लॉकडाऊन सुरूझाल्याने कामाची गती मंदावली. लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस २३ मार्च ते २२ मे पर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनलॉक झाल्यानंतर २३ मे ते १६ ऑगष्ट पर्यंत ५० टक्के क्षमतेने व १७ ऑगष्ट पासून १०० टक्के क्षमतेने ४५ बसेस औराद शहाजानी, उदगीर, लातूर, धामनगाव, मदनसुरी, कोकळगाव, किल्लारी , उजेड उमरगा, पुणे , शिर्र्डी, औरंगाबाद , अकोला , नांदेड सुरू झाल्या. प्रवाशांचा बसने प्रवास करण्याचा ओढा वाढल्यानी बस्थानाकात गर्दी वाढली दरम्यान लॉकडाऊन आहे म्हणून बसेस बंद असल्याने संबंधित ठेकेदाराने कसलीही तात्पुरती पर्यायी व्यवस्था न करता बस्थानाकातील असलेले जुने शौचालय पाडले.

ज्या वेळेस पाडले त्यावेळेस लॉकडाऊनमुळे बसेस बंद असल्याने प्रवाशी नव्हते आता अनलॉक असल्याने बसेस सुरू झाल्याने प्रवाशांचा लोंढा वाढला आहे . मात्र बस्थानाकातील नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले नाही आणि आगारात गेल्या तीन महिन्यापासून शौचालयाची कसलीच सोय नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. पुरुष उघड्यावर टॉयलेटला जात आहेत मात्र महिलांना खूप मोठी कोंडी होत आहे म्हणून येथील आगारप्रमुख युवराज थडकर यांनी संबंधित गुत्तेदारास पर्यायी तात्पुरती शौचालयाची व्यवस्था करण्याचे सुचविले तेव्हा संबंधीत गुत्तेदारांनी कसलीच पर्यायी व्यवस्था केली नाही तदनंतर शौचालय विना प्रवाशांची गैरसोय बाबत वरिष्ठांकडे विभागीय कार्यालयास कळविले मात्र कर्तव्यदक्ष वरिष्ठ अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केले. संबंधित गुत्तेदारर पर्यायी तात्पुरती व्यवस्था करण्याचे काम माझे नाही म्हणून हातवर केले. यामुुळे आगारात शौचालय नसल्याने प्रवाशांची तारांबळ होत आहे .

महामंडळ म्हणते हे काम गुत्तेदाराचे आहे आणि गुत्तेदार म्हणतो हे काम महामंडळाचे आहे तर हे काम नेमके कुुणाचे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दोघांच्या टोलवाटोलवीत प्रवाशांची कुचंबणा होत आहे. यामुळे प्रवाशातून तीव्र संताप व्यक्त करीत तात्काळ आगारात तात्पुरती शौचालयाची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. निलंगा शहरातील बस्थानाकात तीन महिन्यापासून शौचालय नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे लक्ष देऊन तात्काळ संबंधीत विभागास पर्यायी तात्पुरती व्यवस्था करण्याच्या सूचना देतील का ? असा प्रश्न प्रवाशासह शहरवाशीयांतून केला जात आहे.

हे काम एमएसआरटीचे
यासंदर्भात पृथ्वी कन्स्ट्रक्शनचे कंपनीचे परदेसी म्हणाले की , लॉकडाऊनमुळे मजूर मिळत नव्हते आणि आता बजेट नसल्याने काम थांबले असून शौचालयाची पर्यायी व्यवस्था करण्याचे काम आमचे नसून एमएसआरटीसीचे असल्याचे सांगत हात झटकले.

गुत्तेदाराला सूचना, काम अंतिम टप्प्यात
आगारप्रमुख युवराज थडकर यांच्याशी संपर्ककेला असता ते म्हणाले की याबाबत संबंधित गुत्तेदारास सूचना देऊन विभागीय कार्यालयास कळविले आहे तर लातूरचे विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी नवीन बिल्डीगमधील शौचालय शेवटच्या टप्यात असल्याने लवकर सुरू करूअसे एकमशी बोलताना म्हणाले.

पर्यायी सोय करणे गुत्तेदाराची जबाबदार
लातूर विभागीय स्थापत्य अभियंता जगदीश कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की पर्यायी तात्पुरती व्यवस्था करण्याचे काम संबंधित गुत्तेदाराचे आहे मात्र प्रवाशांची गैरसोय पाहून टोलवाटोलवी न करता तात्काळ तात्पुरती आगारात शौचालयाची व्यवस्था करण्यात येईल असे एकमशी बोलतांना म्हणाले.

भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या