27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यातील नव्वद टक्के शाळा उद्यापासून सुरु होणार; शाळेत येण्याची विद्यार्थ्यांना सक्ती...

लातूर जिल्ह्यातील नव्वद टक्के शाळा उद्यापासून सुरु होणार; शाळेत येण्याची विद्यार्थ्यांना सक्ती नाही

एकमत ऑनलाईन

लातूर : सरकारच्या आदेशानूसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करुन प्रशासनाने दि. २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १० वीच्या शाळा व ११ वी, १२ वी कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याची तयारी केली आहे. त्यानूसार आज शाळा, महाविद्यालये उघडले जातील मात्र, विद्यार्थ्यांनी शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. शाळा सुरु करण्यास ग्रामीण व शहरी भागातून कोणीही विरोध केला नसला तरी पालकांच्या इच्छेनूसार विद्यार्थी शाळेत येथील, असे शिक्षण विभागाच्या सुत्रांच्या वतीने सांगण्यात आले.

लातूर जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळेतील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु करायची करण्याबाबतची तयारी झालेली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील माध्यमिक शाळा सुरु करण्यासंदर्भात शिक्षण मंत्री व तिरिक्त मुख्य सचिव शालेय शिक्षण, शिक्षण आयुक्त यांची शनिवारी व्हीसी झाली. त्यामध्ये २३ तारखेपासून शाळा सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण ६४७ शाळांपैकी ५४२ शाळांनी २३ तारखेला शाळा सुरु करण्यासाठी संमती दिली आहे. इयत्ता नववी दहावीसाठी १९ टक्के पालकांचे संमती पत्र आले आहे तर इयत्ता अकरावी बारावीसाठी ३१ टक्के पालकांचे संमती पत्र आलेले आहे. शाळांचे व वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे आजपासून शाळा सुरु करण्यास लातूर जिल्ह्यात कोणतीही अडचण येणार नाही, मात्र दहा टक्के शाळांचे शिक्षकांच्या तपासण्या दि. २४ व २५ तारखेला आहेत त्यामुळे त्या शाळा २६ तारखेपासून सुर कराव्या लागतील.

राज्य सरकाने दि. २३ नोव्हेंबरपासून इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी शाळा सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनवर सोपवला आहे. त्यानंतर सरकारने घेतलेल्या निर्णयानूसार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवार दि. १९ नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन शाळा सुरु करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी असल्याने तसेच पालक आणि शालेय व्यवस्थापन समित्यांनीही त्यासाठी विरोध न केल्याने आजपासून शाळा सुरु होणार हे नक्की झाले आहे.

लातूर शहरातील सर्व १३० शाळा सुरु होणार
लातूर शहरात ९ वी ते १२ वीपर्यंतच्या १३० शाळा आहेत. त्यापैकी १०० शाळांतील इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांच्या ८२६ शिक्षकांच्या कोरोना चाचण्या महानगरपालिकच्या आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आल्या. त्यामुळे शहरातील सर्वच्या सर्व १३० शाळां आजपासून सुरु होणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. महेश पाटील यांनी दिली.

भाजप कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या