24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeलातूरसिलेंडरसाठी अतिरिक्त शुल्क देऊ नये

सिलेंडरसाठी अतिरिक्त शुल्क देऊ नये

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात कार्यरत भारत पेट्रोल कॉपॉरशन, हिंदुस्तान पेट्रोल कार्पोरेशन, इंडियन ऑईल कार्पोरेशन या कंपन्यांच्या वितरकाव्दारे गॅस वितरण सुरु आहे. ऑईल अ‍ॅड नॅचरल गॅसतर्फे सर्व कंपन्यांना पूढील प्रमाणे दर देण्यात आले आहे. (माहे ऑक्टोबर २०२०) घरगुती वापराच्या १४.२ किलो प्रति गॅस सिलेंडरसाठी संबंधित गॅस एजन्सीला ६५ रुपये एवढे कमिशन मंजूर केलेले आहे.

त्यात त्या संबंधित गॅस एजन्सीसाठी ३६ रुपये आस्थापना खर्चासाठी व २९ रुपये एवढी रक्कम त्यांना वाहतुकीसाठी मंजूर केलेली आहे.तसेच ५ किलो प्रति गॅस सिलेंडरसाठी संबंधित गॅस एजन्सीला ३२.०५ रुपये एवढे कमिशन मंजूर केलेले आहे. त्यात त्या संबंधित गॅस एजन्सीसाठी १८ रुपये आस्थापना खर्चासाठी व १४.०५ रुपये एवढीरक्कम त्यांना वाहतूकीसाठी मंजूर केलेली आहे. तसेच अतिरिक्त वाहतूक दर हे काढून टाकण्यास सूचीत करण्यात आले आहे.

गोडावून मधून गॅस सिलेंडर घेतलाकिंवा खरेदी केला जात असेल तर गॅस एजन्सीने १४.२ किलोच्या गॅस सिलेंडरसाठी २९ रुपये आणि ५ किलो साठी १४ रुपये ५० पैसे असे डिलेव्हरी चार्जेस आकारु नये. संबंधित गॅस वितरकांच्या कार्य क्षेत्राबाहेरील ग्राहक असल्यास त्यांनी ते स्वत:हून त्यांच्या सिमा क्षेत्राबाहेरील दुसर-या नजीकच्या गॅस वितरकांकडे ग्राहकांना जोडावे. जेणेकरुन ग्राहकांना वाहतुकीच्या खर्चाचा भूर्दंड पडणार नाही. जिल्ह्यातील सर्व गॅस ग्राहकांना किरकोळ विक्री किंमत दराव्यतिरिक्त कोणताच अतिरिक्त चार्ज लावू नये. तसेच संबंधित गॅस वितरकांनी गॅस सिलेंडरची विक्री दरातच विक्री करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोणत्याही गॅस वितरकांनी पेट्रोलियम मंत्रालयाकडून वेळोवेळी

घोषित होणा-या सेल रिटेल किमतीप्रमाणे गॅस सिलेंडरची विक्री करणे बंधनकारक आहे
कोणत्याही गॅस वितरकांनी त्यांना ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त दरोन गॅस सिलेंडरची विक्री केल्याची तक्रार असल्यास संबंधित तालुक्याचे तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग तसेच जिल्हा पुरवठा कार्यालय, लातूर येथे लेखी तक्रार करावी. या तक्रारीमध्ये चौकशी अंती तथ्य आढळल्यास व ते निष्पन्न झाल्यास त्याच्याविरुध्द जीवनावश्यक वस्तू कायद्यातील तरतुदींच्या अनूषंगाने कारवाई करण्यात येईल.

या वाहतूकीचे अंतर नुसार वाहतूकीचे दर देण्यात आलेले होते ते दर आता रद्द करण्यात येत आहे. तसेच शहरी भागात अनाधिकृतपणे अतिरिक्त घेण्यात येणार १० रुपये दर कोणीही आकारु नयेत व ग्राकांनी देखील असे अतिरिक्त पैसे देवू नयेत. तसेच गॅसधारक ग्राहकांनी कॅश मेमोची पावती घेवूनच सिलेंडर खरेदी करावे असे ही प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

केंद्रीय बँकांचा सोनेविक्रीचा सपाटा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या