27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूरआता जुजबी कारवाई नको; कडक निर्बंध हवेत

आता जुजबी कारवाई नको; कडक निर्बंध हवेत

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहरात कोरोनाचा मीटर वेगाने धावत आहे. दि. २३ फेब्रुवारीपासून तर शहरात दररोज ४० ते ५० कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत महापालिका प्रशासनाची कार्यतत्परता अधिक वेगाने कामाला लागलेली असने अपेक्षीत असताना केवळ विनामास्क फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही कारवाई सुद्धा अभावानेच दिसून येत आहे. त्यामुळे आता अशी जुजबी कारवाई न करता कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज शहरातील अनेक तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे.

लातूर शहरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा अतिवेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणे स्वत:साठी आणि इतरांसाठीही धोकादायक आहे. ही बाब आता कोणला ओरडून सांगण्याची गरज राहिली नाही. कारण गेल्या वर्षभरात तोंडावर मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा, वारंवार हात धुवा, गर्दी टाळा, फिजिकल डिस्टन्स पाळा, हे सांगुन झाले आहे. याविषयी प्रबोधनाच्या अनेक फे -याही झालेल्या आहेत. असे असतानाही काही लोक याकडे गांभीर्याने पाहात नाहीत किंवा तसा विचारही करीत नाहीत. आपल्याला कोरोना होणार नाही, या भ्रमात वावरताना दिसतात. हा त्यांचा भ्रमच उद्या सुपर स्प्रेडर ठरु शकतो, याची थोडीशीही कल्पना त्यांना नसावी, असे म्हणणेही कदाचित चुकीचे ठरु शकते. परंतु जाणिवपूर्वक कोणी स्वत:सह सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यावर दंड करण्याची जुजबी कारवाई करुन भागणार नाही. अशांवर कडक निर्बंध घातले जाणे आवश्यक आहे.

महापालिका आयुक्त यांच्या आदेशाने महापालिका क्षेत्रीय अधिकारी शहरात विविध ठिकाणी पोलिसांची मदत घेवून विनामास्क फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. दंड भरुन घेतल्यानंतर विनामास्क फिरणा-याला मोफत मास्क दिला जातो आहे. अशा प्रकारची कारवाई गेली वर्षभर सुरु आहे. यातून काय घडले?, विनामास्क फिरणा-यांमध्ये काय परिवर्तन झाले? याबाबत महपालिका प्रशासन ठोसपणे काही सांगु शकणार नाही. परंतू, दंडाची रक्कम मात्र महापालिकच्या तिजोरीत जमा झाली हे खरे. त्यामुळे आता दंडात्मक कारवाईची जुजबी कृती नको तर विनामास्क वाहनावर फिरणा-याचे वाहनच जप्त करण्याची कडक कारवाई होणे अपेक्षीत आहे. कोरोना नियमांचा भंग करणा-याचे वाहन जप्त करुन किमान सहा महिने ते वाहन अटकावून ठेवले पाहिजे तरच अशा लोकांवर जरब बसेल अन्यथा कितीही दंड वसुल करीत राहीलात तरी कोरोनाचा वाढता संसर्ग थांवणे शक्य होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

महापालिका कार्यालयात विनामास्क फिरणा-यांवर कारवाई कधी?
रस्त्यावर विनामास्क फिरणा-यांवर महापालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करीत आहे. परंतुू महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील अनेक अधिकारी, कर्मचारी विनामास्क कामकाज करीत असतात तसेच या कार्यालयात येणा-या असंख्य नागरिकांच्या तोंडावरही मास्क नसतो. असलाच तर तो हणवटीवर असतो. असे अधिकारी, कर्मचारी व कार्यालयात विनामास्क येणा-यांवर आयुक्त कधी कारवाई करणार?, हा खरा प्रश्न आहे.

प्रेम प्रकरणातून रेखा जरे यांची हत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या