22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरक्षेत्रीय कार्यालयांत मिळणार ना हरकत प्रमाणपत्र

क्षेत्रीय कार्यालयांत मिळणार ना हरकत प्रमाणपत्र

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
शहरात गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरु असून गणेश मंडळांना अडचणी येऊ नयेत यासाठी लातूर शहर महानगरपालिकेकडून चारही क्षेत्रीय कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र देण्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांनाही तक्रारीसाठी हेल्पलाइन नंबर दिला जाणार आहे. गणेशोत्सव अवघ्या कांही दिवसांवर आलेला असून त्यासाठी मंडळांकडून स्टेज उभारणीची कामेही सुरु झाली आहेत. सार्वजनिक मंडळांना गणेशोत्सवासाठी महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक असते. हे प्रमाणपत्र मिळवण्यात मंडळांना अडचण येऊ नये यासाठी पालिकेच्या चारही क्षेत्रीय कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.या माध्यमातून गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी ना हरकत प्रमाणपत्र मिळवू शकतात.

गणेशोत्सवादरम्यान नागरिकांच्या अनेक तक्रारी असतात. स्पीकरचा आवाज मोठा असणे, रस्त्यावर स्टेज उभारणे, अनधिकृतपणे श्री गणेशाची स्थापना करणे, असे प्रकार होऊ शकतात. या संदर्भात तक्रार करण्यासाठी पालिकेच्या वतीने हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ०२३८२-२४६०७५ या क्रमांकावर दूरध्वनी करुन नागरिक आपल्या तक्रारी नोंदवू शकणार आहेत. याशिवाय चारही क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वतंत्र व्हाट्सअप क्रमांक दिले जाणार आहेत. ‘ए’ झोनसाठी ९०११०३२२१०, ‘बी’ झोनसाठी ९८९०४३५९२२, ‘सी’ झोनसाठी ९४०४२२५३७९ आणि ‘डी’ झोनसाठी ९०११०३२३०२ हे क्रमांक आहेत. नागरिक या क्रमांकावर व्हाट्सअपद्वारेही आपल्या तक्रारी नोंदवू शकणार आहेत.

महानगरपालिकेच्या वतीने या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी उपायुक्त दर्जाच्या अधिका-यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ‘ए’ व ‘बी’ झोनसाठी उपायुक्त विना पवार तर ‘सी’ व ‘डी’ झोनसाठी उपायुक्त मयुरा शिंदेकर यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आतापर्यंत ५९७ गणेश मंडळांची नोंदणी
येत्या ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी विविध मंडळाचे कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांना पोलीस ठाण्यात नोंदणी करावी लागत आहे. आतापर्यंत शहरातील ५९७ गणेश सार्वजनिक गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे. येत्या आठ दिवसांत यात आणखी भर पडणार आहे.

गणेश मंडळांची जोरदार तयारी
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करता आलेला नाही. यंदा कोरोनाचे सावट पूर्णत: हटल्यामुळे गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यासाठी शहरातील गणेश मंडळे सरसावली आहेत. शहरातील नामवंत गणेश मंडळांसह इतर गणेश मंडळांचे पदाधिकारी गणेशोत्सवासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. मंडप उभारणीला वेग आला आहे. ‘श्री’ची मुर्ती निवडुन बुक करण्यापासूुन विविध परवानग्या काढणे आणि दहा दिवसांतील कार्यक्रमांची रुपरेषा आखली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या