28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरऑडिट केल्याशिवाय कोणतेही देयक अदा होणार नाही

ऑडिट केल्याशिवाय कोणतेही देयक अदा होणार नाही

कोरोना टास्कफोर्सची आढावा बैठकीत महापौर, उपमहापौरांचा महत्वपुर्ण निर्णय

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या कोरोना टास्कफोर्सची आढावा बैठक सोमवार दि.२७ जुलै रोजी झाली. शहरातील चारही झोनसाठी नोडल आॅफिसर म्हणून सहायक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मनपाच्या वतीने कोरोना काळातील केल्या जाणाºया प्रत्येक कामाच्या खर्चाचे आॅडिट केल्याशिवाय देयक अदा करु नयेत,असे आदेशही महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी यावेळी दिले.

कंटेन्मेंट झोनसाठी कठोर उपायोजना करण्यासोबतच तात्पुरत्या स्वरुपात मनुष्यबळ वाढवून देण्यासही या बैठकीत मंजुरी देण्यात आली़ कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने टास्क फोर्स गठीत करण्यात आला आहे.  महापालिका कार्यालयात सोमवारी या टास्क फोर्सची आढावा बैठक घेण्यात आली. महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, पालिका आयुक्त देविदास टेकाळे यांच्यासह उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांची या बैठकीस उपस्थिती होती.

शहरातील कंटेन्मेंट झोनची वाढती संख्या पाहता महापालिकेकडे उपलब्ध असणारे मनुष्यबळ कमी पडत आहे. यासाठी तात्पुरत्या स्वरुपातील मनुष्यबळ आवश्यकतेनुसार वाढवून देण्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कंटेन्मेंट झोनमधील उपाययोजनांसाठी अधिक स्वयंसेवक उपलब्ध करण्यासंदर्भात संबंधित प्रभागातील नगरसेवकांची मदत घ्यावी. त्यांच्या माध्यमातून मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे, अशा सूचनाही या बैठकीत करण्यात आल्या.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक सक्षमपणे राबविता याव्यात यासाठी शहरातील चारही झोनसाठी नोडल आॅफिसर म्हणून प्रत्येकी एका सहाय्यक आयुक्ताची नियुक्ती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. संबधित झोन करिताचे सर्व अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.

कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची अधिक खोलवर शोधमोहीम राबविण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील किमान २० व्यक्तींची माहिती संकलित करावी. त्यांच्या तपासण्या कराव्यात, असेही या बैठकीत निर्देशित करण्यात आले.

प्रत्येक खर्चाचे ऑडिट
कोरोनाच्या काळात महापालिकेच्या वतीने विविध कारणांसाठी खर्च केला जात आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कंटेन्मेंट झोनसाठी खर्च होत आहे. या कालावधीत होणा-या प्रत्येक खर्चाचे ऑडिट झाले पाहिजे. ऑडिट करण्यासाठी मुख्य लेखाधिकारी प्रभाकर डाके यांची नियुक्ती करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. काही मनपा सदस्यांनी दूरध्वनीद्वारे महापौर व उपमहापौर यांना कंटेन्मेंट झोनमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केल्या जाणा-या उपाय योजनाबाबत तक्रार व्यक्त केल्या त्यावर संबंधित कामाची पूर्ण तपासणी करुन ठेकेदारावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कंटेनमेंट झोनसाठी कठोर उपाययोजना
कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्या व्यक्तीच्या घराचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला जातो. या परिसरातील व्यक्तीने बाहेर पडू नये यासाठी तो सील केला जातो. या कंटेन्मेंट झोनसाठी आणखी कठोर उपाययोजना केल्या जाव्यात. त्या परिसरातील नागरिक बाहेर पडून इतरांमध्ये मिसळू नयेत. यातून अधिक लोकांना संसर्ग होऊ नये, याची काळजी घ्यावी, असेही महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या बैठकीत सूचित केले.

Read More  निलंगेकर यांच्या हस्ते कोरोना योद्यांचा सन्मान

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या