28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरअतिक्रमणधारकांना कसलीही मुदत दिली जाणार नाही

अतिक्रमणधारकांना कसलीही मुदत दिली जाणार नाही

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्­या हद्दितील रस्­त्­यांवर असलेले अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्­याने सर्वच भागातील अतिक्रमण काढण्­याची मोहिम सध्­या मनपा प्रशासनाकडुन सुरु आहे. त्­यामुळे नागरीकांना आपले अतिक्रमण स्­वत:हून काढुन घ्­यावे. अतिक्रमणावरील कार्यवाहीदरम्­यान कोणत्­याही परिस्थितीत कोणत्­याही अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढुन घेण्­यासाठी मूदत दिली जाणार नाही, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

शहरातील सर्वच भागातील अतिक्रमण काढण्­याची मोहिम सध्­या मनपा प्रशासनाकडुन सुरु आहे. त्­यानुसार गंजगोलाई, महात्मा गांधी चौक ते गंजगोलाई, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच अंबाजोगाई रोडवरील अतिक्रमण काढण्­याचे काम प्रगतीपथावर आहे. महानगरपालिका प्रशासनाकडुन सुरु असलेली अतिक्रमण मोहिम या पुढील कालावधीत निरंतर सुरु राहणार असून नागरीकांनी आपआपले अतिक्रमण स्­वत: काढुन घ्­यावे अन्­यथा प्रशासनाकडुन सुरु असलेल्­या अतिक्रमण विरोधी पथकामार्फत अतिक्रमण निष्­काशित करण्­याचे तसेच रोडवर अतिक्रमणात आलेले साहीत्­य जप्­त करण्­याची कार्यवाही करण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्­या हद्दीतील सार्वजनिक रस्­त्­यावर आलेले अतिक्रमण सर्व अतिक्रमणधारकांनी स्­वत:हून काढुन घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे अन्­यथा प्रशासनाकडुन कठोर कार्यवाही करण्­यात येईल याची नोंद घ्­यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या