28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरनिलंगा तालुक्यात सहा गावांत भूगर्भातून आवाज

निलंगा तालुक्यात सहा गावांत भूगर्भातून आवाज

एकमत ऑनलाईन

निलंगा : तालुक्यातील हासोरी (बु) यासह सहा गावात भूगर्भातून दि १२ सप्टेंबर रोजी रात्री १०. ७ वाजता अचानक आवाज झाला. यामुळे नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर आले. साधारणत: सहा सेकंद धक्का जाणवला असल्याचे व भूकंपाच्या भीतीने नागरिक रात्रभर आळीपाळीने जागी राहिले असल्याचे नागरिकांनी सांगितले. गावात दि ६ व ८ सप्टेंबर मंगळवारी रोजी रात्री हासोरी येथे भूगर्भातून अचानक जोराचा आवाज झाल्याने लोक भूकंपाच्या भीतीने काही क्षणातच रस्त्यावर आले होते. पुन्हा दि १२ सप्टेंबर रोजी रात्री १०.०७ वाजता हासोरिसह उस्तुरी, हारीजवळगा, भूतमुगळी, बोळेगाव, बडूर या गावात जमीन हादरत असल्याचे लक्षात येताच सुरक्षितस्थळी जाण्यासाठी सर्वांचीच धावपळ उडाली .

येथील नागरिक दररोजच्या प्रमाणे रात्री दहा वाजण्याच्या नंतर झोपण्याची तयारी करीत असताना भूगर्भातून अचानक जोरदार हादरे सुरू झाले. जमिनीला हादरे बसत असल्याची जाणीव होत असल्याने अनेकांनी आरडाओरड सुरू केली . सर्व नागरिक तात्काळ आपापल्या अंगणात व रस्त्यावर सुरक्षित स्थळी थांबले. थोडा वेळ कोणालाही काहीच कळत नव्हते. कारण या भागात सन १९९३ च्या किल्लारी भूकंपाच्या आठवणी कायम समरणात असल्याने भीतीमुळे नागरीकांनी घराबाहेर रात्रभर जागे राहिले. सकाळी तहसीलदार सुरेश घोळवे यांनी हासोरी येथे भेट देऊन नागरिकांशी चर्चा करून त्यांना धीर दिला. हासोरी येथे जिल्हाधिकारी, भूगर्भतज्ज्ञ गायकवाड, जिल्हा व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी शेख, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी हासोरी येथील ज्या घरांना तडे गेलेत त्या घरांची पाहणी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या