24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरलातूर शहर जिल्हा काँग्रेसचे लक्षवेधी आंदोलन

लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे लक्षवेधी आंदोलन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
वडगामचे आमदार जिग्नेश मेवानीच्या अटकेचा निषेधार्थ दि. २६ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता येथील महात्मा गांधी चौकात लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासन व भारतीय जनता पार्टीच्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

गुजरातमधील वडगामचे आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी रात्री गुजरातमधून बेकायदेशीररित्या अटक केलेली असून, त्यांना आता पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. ही घटना निषेधार् असून भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही कारभाराचा हा प्रकार आहे. एका लोकप्रतिनिधीने पंतप्रधानाच्या नावाने ट्विट करणे हा काही अपराध नाही. परंतु विरोधी पक्षावर दहशत व भीती निर्माण करण्यासाठी भाजपा सरकारने ही कारवाई केलेली आहे. आमदार जिग्नेश मेवानी यांच्यावर आणखी कठोर कलमाखाली कारवाई करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार, भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही विरोधात आवाज उठवण्यासाठी व आमदार जिग्नेश मेवानी या दलित नेत्यावर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी मंगळवारी सकाथी महात्मा गांधी चौक लातूर येथे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत काळ्या फिती लावून आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी प्रदेश सचिव गोरोबा लोखंडे, लक्ष्मण कांबळे, कैलास कांबळे, रवीशंकर जाधव, प्रवीण सूर्यवंशी, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, सुपर्ण जगताप, व्यंकटेश पुरी, प्रवीण कांबळे, शाहरुख पटेल, अ‍ॅड. फारुक शेख, ज्ञानेश्वर सागावे युनूस मोमीन, नागसेन कानेगावकर, सचिन मस्के, गौरव काथवटे, महेश काळे, पंडित कावळे, नामदेव इगे, सुरेश चव्हाण, सुरेश गायकवाड, इमरान गोंद्रिकर, तबरेज तांबोळी, प्रवीण घोटाळे, कल्पनाताई मोरे, सुलेखा कारेपुरकर, शितल मोरे, दत्ता सोमवंशी, गणेश देशमुख, कुणाल वागज, बप्पा मार्डीकर, संजय सूर्यवंशी,सचिन गंगावणे, प्रा. एम. पी. देशमुख, अमित जाधव, युनूस शेख, अशोक सूर्यवंशी, अभिषेक पतंगे, इसरार पठाण, राहुल डुमणे, पवन सोलंकर, अंगद गायकवाड, अक्षय मुरळे, करीम तांबोळी, बालाजी झिपरे, अभिजीत इगे, अकबर माडजे, विष्णुदास धायगुडे, धनराज गायकवाड, अमोल गायकवाड, महेश शिंदे, पिराजी साठे, राजेश क्षीरसागर, प्रमोद जोशी, नरेश पवार, पवन कुमार गायकवाड, शैलेश भोसले,
प्रकाश बारबोले, राजू गवळी, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या