22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeलातूरआता निलंगा शहरातही चार्ली पोलीस

आता निलंगा शहरातही चार्ली पोलीस

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
काही महिन्यापूर्वी लातूर व उदगीर शहरात चार्ली मोटारसायकल पेट्रोलिंग कार्यान्वित करण्यात आली होती. त्याचे फायदे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे संकल्पनेतून आता निलंगा शहरातही एक मोटरसायकल २४ तास पेट्रोलिंगसाठी कार्यान्वित करण्यात आली असून त्या मोटरसायकलवर आळीपाळीने ड्युटी करिता सहा पोलीस अंमलदार व इन्चार्ज म्हणून पोलिस अधिका-याची नेमणूक करण्यात आलेली आहे.

चार्ली पेट्रोलिंगद्वारे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना, महिलांना, लहान बालकांना व वयोवृद्धांना त्वरित मदत मिळणार असून ट्राफिक जाम, भांडण तक्रारी व काही अनुचित घटना घडत असताना डायल ११२ वर कळविल्यावर लगेचच चार्ली पोलीस पेट्रोलिंगची मोटर सायकल सदर ठिकाणी पोहोचणार आहे. अडचणीत सापडलेल्या निलंगा शहरातील व शहरालगत सात किलोमीटर परिसरातील लोकांनी डायल ११२ वर कॉल करून मदत मागितल्यास चार्ली पोलीस पेट्रोलिंग वरील पोलीस अंमलदार तात्काळ सदर ठिकाणी पोहोचणार आहेत.

त्यामुळे निलंगा वासियांना पोलीस मदत पाहिजे असल्यास त्यांनी त्यांचे मोबाईल मध्ये ११२ असे टाईप करून कॉल केल्यास त्यांना तात्काळ चार्ली पोलीस पेट्रोलिंग कडून मदत पुरविण्यात येणार आहे. तसेच कोणी जर खोडसाळ पद्धतीने किंवा त्रास देण्याच्या उद्देशाने डायल ११२ चा गैर उपयोग केल्यास त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक वेळीच पोलीस मदत मिळविण्याकरिता डायल ११२ चा वापर करावा. तसेच सदरच्या चार्ली पेट्रोलिंग वरील पोलीस अमलदार यांच्याकडे स्वयंचलित शस्त्र व वायरलेस वाकीटॉकी राहणार असून त्याद्वारे चार्ली पेट्रोलिंग ड्युटीवरील पोलीस आपसात कम्युनिकेशन करू शकणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या