24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरआता घरबसल्या करा कर वसुलीसंदर्भात तक्रारी...

आता घरबसल्या करा कर वसुलीसंदर्भात तक्रारी…

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
कर वसुली संदर्भात विविध तक्रारी
नोंदवण्यासाठी नागरिकांना आता महानगरपालिका कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. नागरिकांना तक्रारी नोंदविता याव्यात यासाठी पालिकेने आता स्वतंत्र व्हाट्सअप क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे. लातूर शहर महानगरपालिकेकडून कर वसुली केली जात आहे. यावर्षीपासून मालमत्ता कराच्या मागणी बिलातच पाणीपट्टीचाही समावेश करण्यात आला आहे. ही मागणी बिले मिळाल्यानंतर नागरिकांच्या विविध तक्रारी असतात. कराचा भरणा केला असूनही नवीन बिल येणे, नळ कनेक्शन नसताना पाणीपट्टीचा मागणी बिलात समावेश असणे, मालमत्ता धारकाच्या नावामध्ये बदल असणे यासोबतच थकबाकीची रक्कम भरलेली असतानाही नवीन बिलामध्ये त्याचा समावेश होणे, घरगुती वापर असताना वाणिज्य वापराच्या दराने पाणीपट्टी आकारली जाणे, मिश्र वापर असताना वाणिज्य दराने पाणीपट्टीची मागणी होणे अशा स्वरुपाच्या तक्रारी नागरिक करत आहेत.

आता अशा तक्रारी करण्यासाठी नागरिकांना महानगरपालिका कार्यालयात येण्याची गरज नाही. नागरिकांनी आपल्या तक्रारी ७७७००१४३०५ या व्हाट्सअप क्रमांकावर नोंदवाव्यात. तक्रार दाखल करताना मालमत्ता धारकाचे नाव, मालमत्ता क्रमांक, संपर्क क्रमांक व तक्रारीचे स्वरुप समाविष्ट करावे. कर भरणा केलेला असतानाही पुन्हा बिल आले असेल तर कर भरलेली पावती सोबत जोडावी, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या