लातूर : प्रतिनिधी
केंद्र सरकारने सुरु केलेल्या जवान भरती अन्यायकारी अग्निपथ योजना असुन सदरील योजना रद्द करण्यात यावी, यासाठी लातूर एन. एस. यू. आय. च्या वतीने येथील तहसील कार्यालया समोर खुळखुळा बजाव आंदोलन करुन या योजनेचा निषेध केला. सदरिल योजनेमध्ये चार वर्ष सेवेनंतर ७५ टक्के जवान घरी बसवले जाणार असुन ही अन्यायकारक बाब असुन एखाद १८ व्या वर्षी जवान भरती झाला व २२ व्या वर्षी रिटायर्ड व २३ व्या वर्षी लग्न व नंतर बेरोजगारी हा संभ्रम निर्माण करणारे कायदे लागु करुन जवानांची फसवणुक करण्यात आली आहे. पंतप्रधान नोटाबंदी, कृषी कायदे, अग्निपथ फेल योजना लावुन केंद्र सरकार देश चलवण्यात अपयशी झाले आहे. केंद्र सरकार नेहमी फेल योजना लागु करत असल्याने पंतप्रदानाच्या बुद्धीची किव आल्याने एन. एस. यू. आय. ने खुळखुळा बजाव आंदोलन करुन निदर्शने केला.
सदरील योजना रद्द नाही झाली तर १ ते १० जुलैप्रयत्न पंतप्रधानाच्या खुर्चीचा लिलाव एन. एस. य.ू आय. लातूर येथे करुन जमलेले पैसे पंतप्रधान कार्यालयाला देणार आहे असे आवाहन जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, पवन बनसोडे, सुरज पाटील, उमेश आगळे, रामराजे काळे, उमेश भिसे, सौरभ भिसे, बाळासाहेब करमुडे, काशिनाथ केंद्रे, विशाल ईरले, अक्षित हारेकर, साहील सय्यद, मुस्तकीम सय्यद, दादा भिसे आदी अनेक पदाधिकारी उपस्थीत होते.