६ बाधितांचा मृत्यू, मृतांचा आकडा ४७१ वर
लातूर : जिल्ह्यात अलिकडे रुग्णसंख्येमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सोमवारी नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटल्याचे चित्र पाहायला मिळाले. रोज अडीचशे ते साडेतीनशेच्या दरम्यान रुग्ण वाढत होते. मात्र, आज १६२ नवे रुग्ण आढळून आले. दिलासादायक बाब म्हणजे नव्या रुग्णांच्या तुलनेत आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त म्हणजे २५८ आहे. दरम्यान, आणखी ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा ४७१ वर गेला आहे.
१३ हजार १९२ रुग्णांनी कोरोनावर मात
जिल्ह्यात आज तुलनेने कमी टेस्ट झाल्या. २९२ आरटीपीसीआर, तर ४११ रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. यात आरटीपीसीआर टेस्टमधील ७३ आणि रॅपिड अँटिजन टेस्टमधील ८९ असे एकूण १६२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १६ हजार ५८९ झाली असून, यापैकी आतापर्यंत १३ हजार १९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सध्या २ हजार ९२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागच्या काही दिवसांत कोरोनावर मात करणाºया रुग्णांचे प्रमाण वाढल्याने रुग्णसंख्याही घटल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
मृतांचा आकडा आता ४७१ वर गेला
दरम्यान, जिल्ह्यात आणखी ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये लातूर शहरातील खाडगाव रोड, विशालनगर आणि औसा रोड भागातील रुग्णाचा समावेश आहे. याशिवाय निलंगा, अहमदपूर तालुक्यातील हडोळती, निलंगा तालुक्यातील निटूर येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा आता ४७१ वर गेला आहे.
रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा
लातूर जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. मात्र, मागच्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणारे रुग्ण वाढले आहेत. एकूण १६ हजार ५८९ रुग्णांपैकी तब्बल १३ हजार १९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट ७९.५२ टक्के इतका नोंदला गेला आहे.
५० लाखांवर रुग्ण कोरोनामुक्त; ८२ हजारांवर नवे रुग्ण